Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

घरात नाही पत,मिळेल का याला मत..?



शिरपूर: ब-याचश्या हावश्या-नवश्या-गौवश्यानी मैदानातून पलायन केले खरे, तरी सरपंच पदाच्या निवडणुकीतून माघार घेत सदस्य पदी निवडणूक लढवित आहेत.खरे मात्तबर रिंगणात असतांना अश्याचा कोठे ठाव ठिकाणा लागेल, हे त्यानांच स्वत:ला माहित नाही,मग इतर काय त्यांच्याबाबत भविष्यवाणी करु शकतील ! खरे निवडणुक लडविण्यासाठी प्रथम त्याचे कतृत्व मोठे असावे लागते,त्यानंतर समाज संख्या व त्याची एकी हे सर्व कमीत कमी निवडणुक काळात तरी मत मागणीच्या प्रचारासाठी पाठीमागे उभे असणे, व बरोबर फ़िरले पाहिजे, गावातील जनतेच्या सुख दु:खात नेहमी हजर राहणे,कायम स्वरुपी गावत वास्तव्य असावे,स्वभाने शांत व संयमी असावे.असे किती तरी गुण आंगी असल्यास त्याचा विचार सर्व सामान्य जनता करते.मात्र निवडणुकीच्या मैदानातील काही हावश्या-नवश्या-गौवश्याचे तर कुठलाच ठाव ठिकाणा नसतांना, जसा काही मी आजच निवडणुक जिंकलो असे भासवत आहे. 



आजपावतो ज्याने गावात कोणतेही छोटे मोठे कतृत्व केलेले नाही,कधी सर्व सामान्याच्या कार्यक्रमांना हजेरी नाही,  समजाची संख्या एका हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत आहे,इतकेच नव्हे तर खुद्द आहे तेवढे स्वत:चा समाजबांधव पाठीमागे उभा राहण्यास तयार होत नाही,गावात वास्तव्यास नाही,आहो,ज्याची स्वत:च्या घरात कवडीची किंमत नाही, ज्याची घरातच पत नाही, अश्याला जनता मत देईल तरी कशी ? यालाच म्हणतात 'घरात नाही पत ,मिळेल का याला मत ?'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध