Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

क्रांती दलाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी अमोल बावणे तर उपाध्यक्ष पदी नंदू पडाल यांची निवड....!




शेगाव प्रतिनिधी : शेगाव येथील बैठकीत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नागपूर उच्च न्यायालयाचे विधिज्ञ अमोल बावणे तर कार्याध्यक्ष पदी भद्रावती चे शिवसेना तालुका प्रमुख आणि प्रदेश उपाध्यक्ष पदी खामगाव येथील प्रल्हाद शिरजोशे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी केली आहे महाराष्ट्राची जुनी कार्यकारणी कायम ठेवण्यात आली असून पुढील महाराष्ट्रांची कार्यकारणी संघटनेच्या वर्धापनदिनी 4 जाने 23 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीयअध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी दिली आहे शेगाव येथे 16 डिसेंम्बर ला महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या वेळी वरील पदाधिकारी यांच्या पदाची घोषणा करण्यात आली नवनियुक्त अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की ज्या प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात क्रांती दलाने संघटनात्मक बांधणी करून सामाजिक ताकदीच्या जोरावर दोन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य निवडून आणले त्या नुसार महाराष्ट्रात चंद्रपूर चा प्याटर्न राबवून समाजाला राजकीय दृष्ट्या मजबूत करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या नियुक्ती बाबत उपस्थित सर्व नेत्यांनी बावणे, पडाल, शिरजोशे यांचे अभिनंदन केले 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध