Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली
नंदुरबार : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली.ही मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज स्थानिक नागरिक आणि इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.मूर्ती सापडल्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली असून याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशाची ओळख दक्षिण काशी म्हणून आहे.या ठिकाणी अनेक वेळा खोदकाम करताना पुरातन वस्तू सापडले आहेत.पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना या ठिकाणी एक पुरातन मूर्ती सापडली.ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.ही मूर्ती ध्यानस्थ अवस्थेत असून तिच्या चारी हातात शस्त्र आहेत. त्यामुळे ही मूर्ती नेमकी कोणत्या देवाची हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारीही या ठिकाणी भेट देणार आहेत.
नागरीकांची पुजेसाठी गर्दी
गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी मूर्ती ज्या ठिकाणी सापडले. त्या ठिकाणी पूजा करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मूर्ती ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा निर्धार केला. प्रकाशा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीशी साम्य असलेल्या अनेक पुरातन वस्तू सापडत असतात.पुरातत्त्व विभागाने प्रकाशा परिसरात उत्खनन करून या ठिकाणी सापडणाऱ्या वस्तू कोणत्या शतकातील आहेत; याचा अभ्यास करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा