Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

स्व.अनुसया कपूरचंद बहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ व गोदावरी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहिवद येथे आरोग्य शिबीर आयोजित....



अमळनेर प्रतिनिधी:दहिवद दि.२२ डिसेंबर रोजी दहिवद येथील सरपंच यांच्या मातोश्री स्व. अनुसया कपुरचंद बहारे यांच्या प्रथम  पुण्यस्मरणार्थ भव्य आरोग्य शिबीर संपन्न झाले.या कार्यक्रमाचे आयोजन बचत गट हॉल येथे आयोजित केले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक आबासो.श्री.प्रवीण काशिनाथ माळी मा.उपसरपंच तसेच प्रमुख मान्यवर श्री जयवंतराव गुलाबराव पाटील चेरअमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद,श्री.देवानंद कपूरचंद बहारे सरपंच ग्रा.प.दहिवद,श्री.ईश्वर गिरधर माळी चेअरमन दहिवद वि.का. सोसायटी,गोकुळ माळी सामाजिक कार्यकर्ते श्री.माणिकराव पाटील ग्रा.प.सदस्य,हिराबाई भिल,वर्षा पाटील,मालुबाई माळी,सुनील पाटील, शिवाजी पारधी,योगिता गोसावी, वैशाली माळी उपस्थित होते.आरोग्य शिबीरचे उद्घाटन आबासो श्री.प्रविण काशिनाथ माळी मा.उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर कार्यक्रम सुरवात झाली ह्यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.गावातील व पंचक्रोशीतील व्यक्ती ची आरोग्य तपासणी गोदावरी फौंडेशन जळगाव चे डॉक्टर अब्दुल्ला, डॉ.चेतन्य ,डॉ शिफा याच्या सोबत गोदावरी फौंडेशन च्या संपूर्ण टीम ने 400 लोकांची तपासणी केली.
गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी आरोग्य शिबीर पार पाडण्यासाठी मेहनत घेतली..
   
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जिजाबराव माळी व आभार शिवाजी पारधी यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध