Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

आमदार शिरीष चौधरी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न केला उपस्थित...! मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणार्‍या अवैध गुरे वाहतुकीचा प्रश्न विधानसभेत...!



रावेर प्रतिनिधी : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरुन मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची वाहतूक सुरू असून याबाबत आमदार शिरीष चौधरी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित कारवाईची मागणी केली आहे.यावेळी त्यांनी पालमार्गे काही महिन्यांपूर्वी सुकी नदीत फेकलेल्या २३ मृत गुरांचा संदर्भ देत यातील गो तस्करांवर कठोर कारवाईची मागणी केली.
लम्पी आजाराने १०९ गुरांचा मृत्यू नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असून आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभेतील विविध प्रश्न तारांकीत उपस्थित केले.यामध्ये जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुमारे पाच हजार ५५० महिला लाभार्थींचे सुमारे दोन कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झालेले झाले नाही.रावेर तालुक्यात १४ हजार जनावरांपैकी लंम्पी या आजाराने १०९ जनावरांचा मृत्यू झाला असून यावल व रावेर तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील व पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक रीक्त पदांसह रावेर तालुक्यातील केळी पीक घेणार्‍या सुमारे ८०० शेतकर्‍यांचे विमा योजनेचे लाखो रुपये विमा कंपनीकडून मिळाले नसल्यासह राज्यातील १४ हजार ९८५ शाळांवर टांगती तलवार, रावेर तालुक्यातील गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील १०५ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबे नवीन गावठाणात पुनर्वसन प्लॉट मिळण्याबाबत व रावेर नगरपालिका हद्दीत सन २०२२-२३ ते २०२५-२६ ही चतुर्थ कर आकारणी हद्दीतील व हद्दीबाहेरील मालमत्तेची अवास्तव कर आकारणी केली जात असल्याबाबत आमदार शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली.

आमदारांनी या प्रश्नी वेधावे लक्ष रावेर पंचायत समितीच्या गोठा योजनेत अनियमता झाल्याची ओरड आहे, तत्कालीन वनक्षेत्रपाल आर.जी.राणे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली परंतु कागदोपत्री झाल्याचा आरोप असून पाल-रावेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रावेर तालुक्यात जिल्हा परीषदेने तयार केलेले काही साठवण बंधारे निकृष्ट झाल्याची ओरड असल्याने या प्रश्नाकडे आमदार शिरीष चौधरी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध