Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई...! बोराडी सांगवी रस्त्यावर स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या वाहनासह मुद्देमाल जप्त...!
शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई...! बोराडी सांगवी रस्त्यावर स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या वाहनासह मुद्देमाल जप्त...!
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील बोराडी सांगवी रस्त्यावर बनावट दारू तयार करण्याच्या उद्देशाने लागणारे स्पिरिट याची चोरटी वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बापूसाहेब महाडिक सीमा तपासणी नाका हाडाखेड यांना प्राप्त झाली होती.
त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता संशयित वाहन व मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी-बोराडी रस्त्यावर शुद्ध मद्यार्काची ( स्पिरीट) वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी नुसार दिनांक 20/12/2022 रोजी सांगवी - बोराडी रस्त्यावर बोराडी शिवार बोराडी ता. शिरपूर जि. धुळे येथे सापळा लावून समोरून संशयित वाहन क्र. MH 01 AP 2006 हे येत असल्याचे दिसले त्यास थांबविण्याच्या इशारा केला असता. सदर वाहनाच्या वाहनचालकाने सदर वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले सदर वाहनाची तपासणी केली असता. सदर वाहनाच्या मागील बाजूस दोन 250 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे प्लास्टीक ड्रम स्पिरीटने (शुद्ध मद्यार्क) भरलेले दिसून आले. सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कैलास धुरसिंग पावरा रा.. सामन्यापाडा ता.शिरपूर जि.धुळे.असे सांगितले सदर इसमास जागीच अटक केली.सदर इसमाच्या ताब्यातून स्पिरीटसह वाहन असे एकूण रु.2,64,000/- अंदाजे किंमतीचा मुद्देमाल दारूबंदी गुन्ह्याखाली गु.र.न 02/2022 दिनांक 20/12/2022 नुसार जप्त करून सदर वाहनावर व वाहनचालक/मालक यांचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्या शिरपूर तालुक्यात गैर धंद्यांचे उधान आलेले आहे.
तर बनावट दारु साठी लागणारे स्पिरीट हे वारंवार सापडत आहेत. मात्र याचा खरा सूत्रधार आजपर्यंत पोलीसांच्या हाती लागलेला नाही. मग नेमका खरा सुत्रधार कोण ?
सदरची कारवाई मा.डॉ. विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री.सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री.अर्जुन ओहोळ साहेब विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,नाशिक विभाग,नाशिक,मा.श्री.मनोज शेवरे साहेब अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,सीमा तपासणी नाका हाडाखेड ता. शिरपूर जि.धुळे श्री.बापूसाहेब महाडीक निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क.सीमा तपासणी नाका हाडाखेड, श्री.एस.एस.हांडे निरीक्षक,
शिरपूर श्री.सागर चव्हाण दुय्यम निरीक्षक, श्री.एस.एस.गोवेकर श्री.ए.बी.निकुंबे स.दु.नि.व श्री.शांतीलाल देवरे श्री.केतन जाधव,श्री.प्रशांत बोरसे,श्री.मनोज धुळेकर,जवान तसेच वाहन चालक श्री.रवींद्र देसले यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास श्री.बापूसाहेब महाडीक निरीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेड ता,शिरपूर, जि.धुळे,हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा