Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने पुरवणी अर्थसंकल्पात शिरपूर तालुक्यातील चार रस्त्यांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर



शिरपूर प्रतिनिधी : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर-2022 मध्ये बिगर आदिवासी क्षेत्रातील चार रस्त्यांसाठी एकूण 20 कोटी रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून निधी मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
 
रा.मा.4 अर्थ पासून ते भरवाडे रस्त्यासाठी 6 कोटी रुपये व भरवाडे टेंभे फाटा रस्त्यासाठी 4 कोटी असे एकूण 10 कोटी रुपयांचा निधी भरवाडे परिसरासाठी मंजूर झाला आहे.तसेच राष्ट्रीय महामार्ग 3 शिरपूर फाटा ते शिरपूर शहर पुलापर्यंत काँक्रिटीकरण साठी 5 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी व जुनापाणी ते निमझरी रस्त्यासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिरपूर तालुक्यातील या चार रस्त्यांसाठी एकूण 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात 35 कोटी रुपये त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 कोटी रुपये असा 50 कोटी रुपयांचा निधी गेल्या आठवड्यात मंजूर केल्यानंतर आता 20 कोटी रुपयांचा निधी माजी शिक्षण मंत्री आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध