Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

शिव महापुराण कथेसाठी नंदुरबार-मालेगाव बसेस उपलब्ध करणार-आगार प्रमुख मनोज पवार



नंदुरबार(प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांची श्रीशिव महापुराण कथा मालेगाव येथे होणार असून, यानिमित्त नंदुरबार आगारातर्फे भाविकांच्या सोयीसाठी दिनांक 23 डिसेंबर पासून नंदुरबार-मालेगाव बस सुविधा उपलब्ध करणार असल्याची माहिती आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.दिनांक 23 ते 29 डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे मालेगाव येथे श्रीशिव महापुराण कथेसाठी भाविकांच्या मागणीनुसार धुळे विभागातील नंदुरबारसह इतर आगारातून बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत. नंदुरबार शहर आणि तालुक्यातील पंचक्रोशीतील गावांमधून 44 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी संख्या असतील त्यांच्यासाठी तात्काळ बस उपलब्ध करून मिळणार आहेत. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी भाविकांनी नंदुरबार आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध