Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

विविध पिकांचा संपूर्ण पोषणासाठी पी.एम.बायोटेक ची स्लरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार



कोणत्याही प्रकारची स्लरी बनवत असताना तुम्ही तुमच्या कोणत्याही फळ भागा असतील, भाजीपाला पिके असतील कींवा ऊस पिक असेल व ईतर कोणतीही पिके असतील कोणत्याही पीकासाठी स्लरी क्षेत्रानुसार गरजे प्रमाणे बनवू शकता.व ती पिकास वापरु शकता.सोप्या व कमी खर्चात बनवण्याची पद्धत व वापरण्याची पद्धत:-
200 लीटर ,300 लीटर, 500 लीटर , 1000 लिटर, 2000 लीटर.कींवा या पेक्षा जास्त लीटर पाण्याची टाकी तुम्ही वापरु शकता तूमच्या क्षेत्रानुसार. टाकी सिमेंट , प्लॅस्टिक किंवा लोखंडी चालेल शक्यतो सिमेंट ची टाकी असावी दीर्घकाळ टीकते.ही गुंतवनून एकदाच आहे ( खर्च ) मेंन्टेनेस परत परत काहीच नाही....?
पाण्यात विरघळनारी औषधे कींवा खते ईतर पदार्थ :-

@ ताक ,गुळ, गोमुत्र, वेस्ट डी कंपोजर, एन.पी.के.च्या बॅक्टरिया असतील किंवा इतर कोणत्याही बॅक्टेरिया आतील कींवा इतर
द्रावनिय पदार्थ..?
पाण्यात न विरघनारी औषधे खते कींवा ईतर पदार्थ:-

@शेण ,माती, सर्व कडधान्ये ,शिजवलेला भात आसेल, कींवा पूर्ण पणे पाण्यात न विरघळनारी रासायनिक खते आसतील वापरत आसाल तर स्लरी मधून.
झाडांची पाने असतील जे पाण्यात विरघळत नाही या साठी तुम्ही स्लरी कीती लीटर बनवता त्या गरजे नुसार
तुमच्या घरच्या महीला असतील त्यांच्या न वापरात असलेल्या सूती साडयांच्या गरजे प्रमाणे टेलर कडे जाऊन ब्यागा बनवून 2 पदरी (डबल) आना कींवा घरी शिलाई मिशन असेल तर घरी बनऊ शकता( पिशवी )

नोट:- (वरती दोरी बनवा.)

@ जे पाण्यात विरघळते ते पाण्यात टाका व जे पाण्यात विरघळत नाही ते तयार केलेल्या पिशवी मध्ये भरा पिशवीचे तोंड बंद करा दोरीच्या साहयाने व पाण्यात टाकून द्या.

@ जे पाण्यात विरघळत नाही त्याचा पूर्ण अर्क पाण्यात ऊतरेल व पिशवीतील राहीलेले रॉ मटरेल शेनखताच्या ढीगावरती टाका कींवा 🍇 बागेच्या बोदावरती ईतर पीके असतील तर शेतामध्ये विसकटून टाकू शकता.

@ तूमच्या कामाच्या वेळेतून दिवसातून 2 किंवा 3 वेळा काटीच्या ( बांबू ) साहयाने सर्व स्लरी बनवलेले द्रावन हलवा. 8 ते 10 दिवसा नंतर मग आपल्या पिका साठी वापरू शकता.

@ स्लरी तयार झाल्या नंतर H.t.p. च्या फूटवॉल ला स्टेशनरी मधून बेदाना मनी पसरण्याची जाळी आणा तूमच्या जवळ उपलब्ध असेल तर ती सुद्धा चालेल 2 फुट लांब व 2 रुंद व ती फुटबॉलला घट बांधवी.

@ टाकी उंचावरती आसेल तर जाळी हॉल ला पण बांदू शकता ही तयार झालेली स्लरी तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता.पाटपाणी आलेल तरी देऊ शकता. कींवा स्लरी सोडण्याचा सांगडा ( गाडा ) असलेल.

@ आज मार्किट मध्ये स्लरी सोडण्याचा सांगाडा ( गाडा ) विकत मिळतो.कींवा तुम्ही स्व्तःच बनतू शकता तुम्ही कारागीर आसाल तर... त्या साठी येनारा खर्च कीती येतो मला माहिती नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनाच माहित.

@ सांगाडा पद्धतीने स्लरी सोडण्यासाठी तीन मजूर लागतात. 1 ट्रॉक्टर चालवतो पाटीमागे 2 घे जण स्लरी बोदावरती ओतण्यासाठी . ट्रॉक्टर ला लागणारा इंधनाचा खर्च वेगळा ....?
व 3 मजूरांचा खर्च कीती.?

@ ज्या शेतकऱ्यांच्या जवळ सांगाडा (गाडा)नसेल त्यांना हाताने आळवणी घालावी लागते मजूरांचा खर्च वाढतो त्या मूळे बरेसचे शेतकरी स्लरी वापरल्याने रिज्ल्ट प्रत्येक पिकासास मीळतो हे माहिती असूनही स्लरी बनवत नाही.

@ स्लरी तयार करण्यासाठी पण मार्किट मध्ये टाकी ऊपलब्ध आहेत त्यासाठी येनारा खर्च मला माहिती नाही ज्यानी विकत घेतली अलेल कींवा बनवून घेतली असेल त्यांनाच माहीत
असेल.

@ माझा सांगण्याचा हेतू येवडाच आहे की मी सांगीतल्या प्रमाणे स्लरी बनवण्याचे साहित्य वापले की शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल व वापरण्यास सोपे जाईल.
सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम असते असे नाही.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध