Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

नाशिक शहरात आपण दरवर्षी आतुरतेने वाट पाहत आसणा-या स्नेह मेळाव्याची प्रतिक्षा संपली



नाशिक प्रतिनिधी: रविवार दि. ११.१२.२०२२ रोजी नाशिक भोई समाज सेवा संस्थेच्या कार्यकारणीची बैठक अध्यक्ष श्री.वामन आप्पा तमखाने यांचे निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली,बैठकीत सालाबादा प्रमाणे संक्रांति निमित्त होत असलेल्या तीळगुळ वाटप,सांस्कृतिक कार्यक्रम तथा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्याचे ठरले असुन सदर कार्यक्रम रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२.०० ते रात्री ९.०० वा.पर्यंत रोटरीक्लब गंजमाळ, नाशिक येथे घेण्याचे निश्चित झालेले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा तथा कार्यक्रमाचे स्वरुप लवकरच निमंत्रण पत्रिकेद्वारे समाज बांधवां पर्यंत पोहचविण्यात येणार आहे,सदर बैठकीस अध्यक्ष श्री वामण आप्पा तमखाने, सचिव श्री रविंद्र वाडिले, खजिनदार श्री सुनिल वाडेकर,श्री तुषार बोरसे सर,सल्लागार श्री भरतजी ढोले,श्री प्रकाश फुलपगारे, श्री अनिल वाडेकर साहेब श्री रामदास लाडे साहेब, सल्लागार श्री तुषार साटोटे,श्री निलेश वाडिले,श्री गोकुळ शिवदे, सौ वैष्णवीताई वाडिले आदि उपस्थित होते.

प्रसंगी भोईसमाज युवा मंच मालेगाव तालुका आयोजित वधु वर परीचय मेळाव्याचे निमंत्रण देऊन सर्वच समाज बंधु भगीनी सहकार्य करतील असेही आश्वासन सदर बैठकीत पदाधिकारी मार्फत देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध