Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
ओ.एम.रुपनर माध्यमिक विद्यालय बाभळे,ता.शिंदखेडा,जि.धुळे येथे 18 विद्यार्थ्यांना 'युवकमित्र परिवाराच्या 'सायकल बँक'उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप व ग्रंथालयासाठी पुस्तके भेट..!
ओ.एम.रुपनर माध्यमिक विद्यालय बाभळे,ता.शिंदखेडा,जि.धुळे येथे 18 विद्यार्थ्यांना 'युवकमित्र परिवाराच्या 'सायकल बँक'उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप व ग्रंथालयासाठी पुस्तके भेट..!
बाभळे प्रतिनिधी:युवकमित्र परिवार संस्थेमार्फ़त राबविल्या जाणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत शाळा ते घर येथून 3 ते 4 कि.मि.पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजु अशा 18 विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेचे संस्थापक तथा सायकल बँक योजनेचे प्रमुख प्रविण महाजन हे अध्यक्षस्थानी होते.
ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक श्री.अण्णा माळी सर महाजन हायस्कूल धुळे,श्री.राहुल महाजन सर,सोनगीर आरोग्य दूत दिलीप माळी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.भटू राजे, ग्रुप ग्रामपंचायत बाभळे वाघाडी खु,उपसरपंच श्री.भरत पाटील, श्री.किसन पाटील,श्री.दत्त बोरसे,
श्री.राकेश पाटील,श्री.समाधान पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल साळुंके सरांनी केले.श्री. आण्णा माळी सर व श्री.प्रविण महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त आयोजित या कार्यक्रमात युवकमित्र परिवाराचे श्री.प्रविण महाजन यांनी याच अठवड्यात संपूर्ण खान्देशातील शाळामध्ये २५० सायकली वाटप करणार असल्याचे जाहीर केले.यावेळी सायकल दुरुस्तीकरीता शाळेचे संस्था अध्यक्ष आप्पासो श्री.लखन रुपनर सचिव श्री.मनोहर रुपनर यांचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा