Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच चित्रलेखा ढोलेंनी रणशिंग फुंकले ; अवैद्य धंद्यांना बसणार चाप
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच चित्रलेखा ढोलेंनी रणशिंग फुंकले ; अवैद्य धंद्यांना बसणार चाप
पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री व जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत.लाखेवाडीतील महिला एकवट्याला असून ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.पोलीस आणि तहसील विभागाला ही याचे निवेदन देण्यात आले आहे.
चित्रलेखा ढोले या नुकत्याच गावच्या सरपंच म्हणून जनतेतून निवडून आल्या आहेत.गावच्या कारभाराची सूत्रे हाती घेताचं ढोले यांनी एका विधायक कामाने आपल्या कर्तव्याची सुरवात केली आहे.गावात चालू असणारे ताडी विक्री, जुगार यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असल्याने ढोले यांनी असे अवैद्य धंदे चालवणाऱ्यांना ललकारले असून त्यांचा पुरता बंदोबत करण्यासाठी त्यांनी मोहिम ही आखली आहे.
लाखेवाडी या गावामध्ये अवैध दारुविक्री, ताडी विक्री करणारी १२ ते १५ दुकाने असून जुगार खेळणारे दोन तीन अड्डे आहेत.दारुमुळे गावामध्ये अशांतता,मारामाच्या घटना घडत आहेत.त्यामुळे कुटुंबातील स्त्रियांचा छळ होत आहे.दारु पिऊन वाहन चालवणे,त्यामुळे अपघात घडणे, शेजारी राहणाऱ्यांना त्रास देणे.अशा गोष्टी घेत असल्याने दारु बंदी होणे आवश्यक आहे.यासाठी दि.१३ जानेवारी रोजी सरपंच चित्रलेखा ढोले यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती.या सभेत ग्रामपंचायत हद्दीतील सुरु असलेले दारु मटका यासारखे अवैद्य धंदे मोडून काढण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
सबंधित ठरावाची प्रत आणि सरपंच व ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांसह तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले.त्यामुळे लाखेवाडत चालणाऱ्या या अवैद्य धंद्यावर आता पोलीस विभाग कारवाईत करणार का? याकडे सर्वांची नजर लागली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या ...
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा