Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने.26जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त.आकाशवाणी चौक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा...!
जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने.26जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त.आकाशवाणी चौक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा...!
जळगाव प्रतिनिधी:आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहाप्रभारी मा.गोपाल भाई इटालिया,राज्य संयोजक मा. रंगा राचूरे आणि राज्य समिती यांच्या आदेशाच्या सूचनेनुसार आज देशाच्या ७४ व्या "गणराज्य दिनी" गुरुवार दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने जळगाव शहर आकाशवाणी चौक जळगाव या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ध्वजारोहण रिक्षा चालक अरबाज गवळी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष मा.श्री. तुषार सर यांच्या सुचनेनुसार महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील. सर्व तालुका अध्यक्ष.शहर पदाधिकारी उपाध्यक्ष सचिव.व अनेक वरिष्ठ नागरिक,माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी,तरुण तरुणी, प्रतिष्ठित नागरिक.तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व पक्षाचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने संपूर्ण शिस्तपालन करत ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळेस भारताच्या संविधानाची "प्रास्ताविका" (preamble) चे जाहीर वाचन करण्यात आले. हा देश सर्व थोर पुरुष व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे च चालला पाहिजे, संविधानातील मूल्ये आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे तसेच समाजातील सर्व जात, भाषा, धर्म व पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे अशी भावना प्रमुख पाहुणे तसेच अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांनी केली. जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते तसेच जिल्हा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळेस विविध कार्यक्रम आयोजन देखील करण्यात आले होते.
मीडिया विभाग,
जळगाव जिल्हा.योगेश भोई
मो.नं.8600877287
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा