Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
उद्या राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील,त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक !!
उद्या राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील,त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक !!
मात्र,नेहमप्रमाणे झोपलेल्या प्रशासकीय व्यवस्थेने २० जानेवारीला परिपत्रक काढले आहे आणि पुडच्या ५ दिवसांत ते खेडोपाडी पोचवायचे आहे !
पत्र जा.क्र./मविशा-४/०४२२/प्र.क्र.१७/२०२२।१३७, दिनांक २० जानेवारी, २०२३
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, सर्व.
विषय- दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजीच्या प्रजासत्ताक दिनी जल जीवन मिशनचे अनुषंगाने ग्रामसभेमध्ये कामांच्या बाबतीत वाचन व चर्चा विनीमय करणेबाबत.
देशभरात केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.सदर अभियानांतर्गत "ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह पुरेसे (५५ लिटर प्रति मानसी, प्रतिदिनी) व नियमित स्वरुपात पाणी पुरवता करण्याचे" उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्यात सर्व ३४ जिल्हयातील एकुण १,०६,१०,७२० (७२.३१%) कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच, माहे मार्च २०२४ अखेर पर्यंत संपुर्ण राज्य हे "हर घर नल से जल" म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे.
०२. सदरच्या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने दिनांक २६ जानेवारी,२०२३ रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
अ) ग्रामसभे दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात यावे व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना अवगत करावे.
(आ) पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात यावे व सदर महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करावीत,जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल.
इ) ज्या ग्रामपंचायतींमध्ये क्षेत्रिय तपासणी संच (FTK) पोचलेले नसतील त्या ठिकाणी जिल्हा व पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून सत्वर कार्यवाही करण्यात यावी.
ई) ग्रामसभे दरम्यान क्षेत्रिय तपासणी संच (FTK) च्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये समजावणेबाबत उचित कार्यवाही करावी.
उ) ज्या ग्रामपंचायतीत क्षेत्रिय तपासणी संच उपलब्ध असतील त्या ठिकाणी पाणी गुणवत्ता तपासणी अनुषंगाने महिलांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करण्यात यावे जेणेकरुन ग्रामस्थांचा नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी गुणवत्तेच्या अनुषंगाने आत्मविश्वास वाढीस लागेल.ऊ) ग्रामसभे दरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे,मंजुर निविदेची रक्कम,योजनेचा कालावधी,कंत्राटदारांचे नाव,नळ जोडणीची सद्यस्थिती इ.तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात यावी व त्याअनुषंगाने चर्चा घडवून आणावी.
ॠ) योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी ५% किंवा १०%), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा - करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा घडवून आणण्यात यावी.
ल) ज्या ठिकाणी योजनेची भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत.
ऍ) नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करण्यात यावी.
ऐ) दिनांक २६ जानेवारी पूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे समूह माहिती फलक (Community Information Board) योजनेच्या ठिकाणी यापूर्वी प्रदर्शित केला नसल्यास,तो प्रदर्शित करणे व ग्रामसभेमध्ये अवगत करणे.
०३.आपल्या जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये वरील सर्व नमूद बाबींच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करुन त्याअनुषंगाने कार्यवाहीबाबतचा निवडक बाबनिहाय छायाचित्रांसह संक्षिप्त अहवाल तसेच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले असल्यास त्यासंदर्भातील अहवाल या कार्यालयास दिनांक ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी पर्यंत सादर करण्यात यावा,हि विनंती.
मा.अभियान संचालक,जल जीवन मिशन यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
प्रकल्प संचालक,जल जीवन मिशन,
राज्य पाणी व स्वच्छता मिशन
प्रतः
१.मा. प्रधान सचिव,पा.पु.व स्व.वि., मंत्रालय,मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.
२.मा.सदस्य सचिव,म.जी.प्रा.यांना माहितीस्तव सविनय सादर.
३.कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
४.प्रकल्प संचालक,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु.,जि.प.यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा