Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

शेतकऱ्यांना ऑटोमायझेशन सिस्टीम उभारण्याकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याची खासदार उमेश दादा पाटील यांची केंद्रिय कृषि मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी



प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत Per Drop More Crop अंतर्गत ऑटोमयझेशन सिस्टीम उभारणी करणे या घटकाचा समावेश होणे बाबत केली विनंती.जळगाव जिल्हात मोठ्या प्रमाणात शेतकरी पिकांना सिंचन करण्याकरिता ठिबक व तुषार सिंचन संचाचा वापर करीत आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुख्य पिकांमध्ये केळी, कापुस, लिंबू, मोसंबी, पेरू, ऊस इ. पिकांचे लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून मुख्य पिकांना ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असते यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे.
सदरील विषयाबाबत शेतकऱ्यांसमवेत चर्चा करत असताना असे प्राप्त झालेल्या सूचनेनुसार असे निदर्शनास आले आहे की, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, खतांची बचत होणे व मजुरी वरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 50 टक्के अनुदानावर अत्याधुनिक ऑटोमयझेशन सिस्टीम उपलब्ध झाल्यास खर्च कमी होण्यास फार मोठी मदत होणार आहे. या घटकाचा मार्गदर्शक सूचनेत समावेश झाल्याने शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मोठा फायदा होऊन आर्थिक स्थिती सुधारणा देखील मदत होईल.
या अनुषगाने सदरील घटकाचा मार्गदर्शक सूचनेत समावेश करण्याबाबतची आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध