Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
छडवेलचे भूमीपुत्र इंजि.श्री.प्रशांत लोटनराव बेडसे (रावसाहेब )आपल्या 37 वर्षे प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून आज दिनांक 31जानेवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत .
छडवेलचे भूमीपुत्र इंजि.श्री.प्रशांत लोटनराव बेडसे (रावसाहेब )आपल्या 37 वर्षे प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून आज दिनांक 31जानेवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत .
छडवेल गावचे भूमिपुत्र इंजि.श्री.प्रशांत लोटन बेडसे (रावसाहेब) 37 वर्ष सेवा नंतरनिवृतीपूर्वी त्यांना जिल्हा जलसंधारण अधिकारी या पदावरुन उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून थोड्याच दिवसासाठी मिळालेली पदोन्नती हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल .आपल्या प्रशासकीय सेवेत त्यांना सन 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले. सन 1982 ते1985 दरम्यान कर्नाटक राज्यातून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका घेऊन आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली .सन 1985ते 1987 दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग नवापूर येथे नोकरीस असताना जेष्ठ नेते माजी मंत्री नाईक साहेब व कै.माजी केन्द्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव दादा यांच्या कुटुंबाशी आपल्या मितभाषी स्वभावामुळे जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले .1987ते1990 दरम्यान कृषी ग्रामीण विकास बॕकेत परभणी,नाशिक ,धुळे या जिल्ह्यात नोकरी निमित्ताने कार्यरत होते .सन 1990ते 2023 एकुण 33 वर्षाचा नोकरी कार्यकाल मात्र नवापूर,साक्री,धुळे जिल्ह्यात गेला आणि निवृतीही धुळे जिल्ह्यातच हा एक सुवर्णक्षण.आजच्या युगात 37वर्ष एवढया प्रदीर्घ नोकरीचा कार्यकाल घालवणे वाटते तेवढे सोपे नाही ..मितभाषी,नम्रता सर्वांशी जुळवून घेणे अशा बहुविध गुणांनी अनेकांना परिचित असलेले प्रशांत रावसाहेबांचा जीवनकाल पण अनेक चढउतारांनी भरलेला आहे ...कुटुंबात 6बहिणी आणि दोन भाऊ.वयाच्या 27व्या वर्षी पितृछत्र हरपले.घरातील सर्वात जेष्ठ म्हणून अंगावर अचानकपणे आलेली कौटुंबिक जबाबदारी निभवतांना कुठेच तक्रार नाही .त्यातच 40वर्षी मातृछत्रपण हरपले. आई बाबा गेल्यानंतर खर्या अर्थाने या कुटुंबाला जर कोणी मायेची ऊब दिली असेल तर ती प्रशांत रावसाहेबांनी.घरातील प्रत्येक जण (दोन पिढ्या)आपआपल्या क्षेत्रात जिद्दीने,स्वबळावर पुढे वाटचाल करत यशाची शिखरे गाठत आहेत .प्रशांत रावसाहेबांनी कुटुंबात आत्मविश्वासाची बिजे पेरल्यामुळेच हे सर्व काही शक्य झाले .अशातच सोबतीला असलेली जिवनसाथी अर्थातच भाग्याची स्री ..धर्मपत्नी भाग्यश्रीची साथ नेहमीच मोलाची राहीली..बहिणी भावांच्या जबाबदाऱ्या निभवताना उज्ज्वलतेचा सहवास भगीणी उज्ज्वला माईनी संकट समयी भावाला बरोबरीने साथ दिली . कुटुंबातील भावा बहिणींचे म्हणजे ...भाऊ हा शब्द उलटा वाचला तर उभा होतो. आई बाबा गेल्यानंतर आम्हा भावा बहिणींसाठी चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आमच्या पाठीशी उभा राहीला तो भाऊ म्हणजे आमचा दादा आमच्या साठी कायमच ग्रेट राहील. या प्रतिक्रिया आहेत प्रशांत रावसाहेबांच्या कुटुंबातील . म्हणूनच जो .प्र....जीवनातील प्रवासात अनेक संकटे आणि वादळांना सामोरे जाताना प्रशांत नावाचा हा माणूस कमालीचा शांतच दिसला.कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना जन्मभूमीशी आपली नाळ कधीच तुटू दिली नाही ..आपल्या नोकरी काळात परिसरात अनेक सिमेंट बंधारे,पाझर तलाव निर्माण केले ..स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग नोंदवला.माझ्या गावासाठी मी काहीतरी केले पाहिजे हे वडिलांनी घालून दिलेले संस्कार डोळ्यासमोर ठेवून अनेक गरजूंना संकटसमयी मदतीचा हात दिला .ज्या ज्या वेळी कामानिमित्ताने धुळ्यात जाण्याचा योग आला तर जिल्हा परिषदेत रावसाहेब ,अनिल दादा आणि दिनेश महाले यांना भेटल्या विना धुळे वारी शक्यच नसायची..आपली हक्काची माणसं जिल्हा परिषदेत आहेत असा विश्वास निर्माण केल्या मुळे तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडवतांना या सर्व मंडळी नेहमीच पुढाकार घेऊन धावपळ करतांना दिसत होत्या ..आज होणाऱ्या निवृत्त अर्थातच कार्यपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जि.प.अध्यक्ष दहिते बापूंचे असणे म्हणजे बेडसे परिवारांशी वर्षानुवर्षाचे स्नेह आणि प्रेम आजही टिकून आहे याचे हे उत्तम उदाहरण ..आपल्या सेवापूर्ती कार्यक्रमास शुभेच्छ्या व्यक्त करतांना आपले निवृती नंतरचे आयुष्य सुखकर आणि निरोगीमय जावो हीच प्रार्थना पंडितराव बेडसे पत्रकार यांचा कडून हार्दिक शुभेच्छा..
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा