Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

जयदया सार्वजनिक वाचनालय सामोडे येथे नाशिक विभागीय ग्रंथालय अधिवेशन उत्साहात संपन्न...!



पिंपळनेर(प्रतिनिधी)नाशिक विभाग ग्रंथालय संघ व धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे विभागीय अधिवेशन जयदया सार्वजनिक वाचनालय सामोडे येथे उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गजानन कोटेवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते,मा.जिभाऊ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ.हे होते. 


याप्रसंगी श्री.हंसराजजी दयाराम शिंदे, अध्यक्ष जयदया सार्वजनिक वाचनालय सामोडे,सौ.मनिषा हंसराज शिंदे उपाध्यक्ष,जयदया सार्वजनिक वाचनालय सामोडे.यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.श्री.अनिल दयाराम शिंदे सचिव.जयदया सार्वजनिक वाचनालय,मा.श्री डॉ.पितांबर सरोदे ग्रंथ मित्र, नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी,कार्यवाह श्री.अनिल सोनवणे,कोषाध्यक्ष प्रविण पाटील, ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अॅड. संभाजीराव पगारे, संचालक श्री आण्णा कृष्णा धुमाळ, डॉ.नरेंद्र बाबुराव गोसावी,गांगेश्वर एज्यू.सोसायटीचे चेअरमन श्री.शंकरराव नाना शिंदे, श्री. दतात्रय काशिराम शिंदे उपाध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे, श्री.विनायक सिताराम देवरे सचिव सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे,श्री प्रकाश दयाराम शिंदे, चेअरमन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI),श्री.शरद दयाराम शिंदे खजिनदार जयदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे, श्री.दीपक भारुड जि.प.सदस्य धुळे,श्री.रमेश महंत,अध्यक्ष वि.का.सोसायटी सामोडे. श्री. संजय दयाराम शिंदे शिखर बँक नाशिक,सौ.आरती दिपक भारुड सरपंच सामोडे,श्री.सचिन शिंदे  उपसरपंच सामोडे, श्री.रावसाहेब घरटे  सदस्य ग्रामपंचायत सामोडे,श्री.मुकुंद घरटे मा.उपसरपंच सामोडे ,श्री.सचिन जोपुळे सहाय्यक ग्रंथालय संचालक नाशिक,श्री.अशोक गाडेकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.नगर, श्री.धरमसिंग वळवी जिल्हा ग्रंथालय अधिकारी नंदुरबार, श्री.सुहास रोकडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव, श्री.जगदीश पाटील,जिल्हा ग्रंथालय अधिकारी धुळे, श्री.चंद्रशेखर ठाकूर निरीक्षक जि.ग्र.कार्यालय धुळे. आदी उपस्थित होते.

याप्रसंगी धुळे जिल्हा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जयदया सार्वजनिक वाचनालय सामोडे यांना देण्यात आला.यावेळी धुळे,नंदुरबार, नाशिक,जळगाव,अ.नगर जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी संचालक कार्यकर्ते व सेवक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध