Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

सटाणा तालुक्यातील तळवाडे भामेर ग्रामपंचायतिचा लोकनियुक्त सरपंचपदी दिनेश गायकवाड तर उपसरपंच पदी दिलीप बोरसे यांची सर्वानुमते निवड



आज दि. 09/01/2023 रोजी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालय तळवाडे भामेर येथे सरपंच व उपसरपंच पदाची प्रशासकिय नेमणूक करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी व्ही पी महाले यांचा उपस्थितीत ही निवडणूक पार पाडण्यात आली मौजे तळवाडे भामेर गावचे लोकनियुक्त सरपंच पदी तरुण व तडपदार श्री. दिनेश केवळराव गायकवाड यांनी तर उपसरपंच पदी एक वर्षासाठी श्री.दिलीप धवळू बोरसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उर्वरित सर्व सदस्यांना पुढील प्रत्येकी एक वर्षासाठीं उप सरपंच पद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपस्थित गट नेत्यांनी दिले व यात सर्व सदस्य खलील प्रमाणे 
 सौ.यमुनाबाई उदाराम माळी,
सौ.सकूबाई देवा पवार,सौ.मंगल नितीन भामरे,सौ.मनीषा श्रीराम हादगे,सौ.इंद्रायणी उमेश गायकवाड,श्री.रोशन पोपट गायकवाड,श्री.चैत्राम रानु मोरे,श्री.लक्षमन सुकदेव जाधव, या सर्व सदस्ययांचा सत्कार गावकर्यांकडून करण्यात आला यात प्रथम लोकनियुक्त सरपंच यांचा सत्कार गावातील जेस्ट नागरिक श्री.दत्तात्रय किसन गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला  व नवनिर्वाचित उप सरपंचाचा सत्कार गावातील जेस्ट नागरिक व रिटायर्ड शिक्षण श्री.मल्हारी जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.यावेळी गावातील सर्व जेष्ठ नागरिकांची व तरुणांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी त्यात मुख्यत्त्वे ग्रा.प. शिपाई अनिल गायकवाड वाटरमन सचिन गायकवाड यांचे सहकार्य लाभले.तालुका पोलीस प्रशासनाने देखील आपले कर्तव्य बजावले.तसेच या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.शिक्षक श्री प्रशांत गायकवाड यांनी केले होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नितिन देवरे यांनी केले अंत्यत खेळी मेळीचा वातावरणात ही सर्व निवडणुक उत्साहात पार पडली

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध