Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई वाहनांसह ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात...! कत्तलीसाठी जाणारी गोवंशला जीवनदान देण्यात यश...!
पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई वाहनांसह ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात...! कत्तलीसाठी जाणारी गोवंशला जीवनदान देण्यात यश...!
साक्री प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकास गोवंश तस्करीवर मोठी कारवाई करून 19 गोवंशला जीवनदान देण्यात यश आले असून या प्रकरणात 12 लाख 91 हजारच्या मुद्देमाल जप्त करून पुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदस्य कारवाईचे पिंपळनेर तालुक्यातून प्राणी मित्रांकडून कौतुक करण्यात येत आहे.
पिंपळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रात्री पेट्रोलिंग वर असणाऱ्या पथकास सूचना देऊन एक टाटा कंपनीची आयशर गाडी क्रमांक एम.एच. १८ ए.ए.०८४८ हिचेत गायी कत्तलीसाठी निर्दयतेने भरुन घेऊन जात असल्याने कारवाई करण्यास सांगितले.
११/०१/२०२३ रोजी पहाटे ०३.०० वाजेचे सुमारास पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात,सरकार हॉटेलचे पुढे रोडवर वळण रस्ता असलेल्या ठिकाणी सुमारे ०३.०० वा. चे सुमा,सापळा लावला असता सदर टाटा कंपनीची आयशर गाडी क्र.एम.एच.१८ ए.ए.०८४८ ही गाडयांचे लाईटाचे उजेडात येतांना दिसल्याने तीस बॅटरी मारुन थांबविण्याचा ईशारा केला असता सदर गाडी वरील चालक याने गाडी न थांबविता भरधाव वेगाने जावु लागला त्यानंतर लागलीच सदर गाडीचा पाठलाग करुन गाडी थांबवली.सदर गाडीची मागील बाजुस एक लाकडी व दोन लोखंडी पाटया लावलेल्या होत्या त्याचेवर चढून बॅटरी चालु करुन पाहीले व सदरची गाडी चेक केली असता सदर गाडीमध्ये गायी हया निर्दयतेने दोर बांधुन दिसल्या.सदर ठिकाणी रहदारी असल्याने व अंधार असल्याने सदरची गाडी ही पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणुन लाईटाचे उजेडात चेक केली असता सदर वाहनात कत्तलीचे उद्देशाने विविध वयाची 19 गोवंश जनावरे आढळून आली.त्यांची अंदाजीत किंमत 2 लाख 91 हजार रुपये इतकी असून ताब्यात घेतलेले वाहन ची किंमत अंदाजे 10 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे या कारवाईत 12 लाख 91हजार रुपयाच्या मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पंकज दत्तात्रय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ड्रायव्हर एकलाक अजिज शेख वय ४५ वर्षे,धंदा ड्रायव्हर,रा.इस्लामपुरा, नवापुर,ता.नवापुर,जि.नंदुरबार याच्या विरोधात भा.दं.वि.कलम २७९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७७ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (अ) चे उल्लंघन ९ व प्राण्याना निर्दयतेने वागणुक करण्यास प्रतिबंध करणे अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), (च), (ट) प्रमाणे व मोटर वाहन कायदा कलम १९८८ चे कलम ६६ (१) १९२, १८४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पंकज दत्तात्रय वाघ,पोसई
व्ही.आर.बहिरम,पोहेकॉ,अशोक.
एस.पवार,चापोकॉ.एन.आर.परदेशी , पोहेकॉ राकेश बोरसे ,पोहेकॉ नरेंद्र परदेशी यांच्या पथकाने केले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा