Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ जानेवारी, २०२३
पठाणला नंदुरबार मध्ये विरोध चित्रपट प्रदर्शित करू नका
पठाणला नंदुरबार मध्ये विरोध
चित्रपट प्रदर्शित करू नका
नंदुरबार हिंदू धर्मियांची भावना दुखावणाऱ्या व त्यांच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बंदी घालावी व चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अभिनेते शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा या
चित्रपट ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये जर चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ,हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच ‘हॉलीवूड’ यामध्ये सातत्याने ‘सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल ? हाच प्रयत्न केला जातो.‘हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल ? हीच संधी शोधली जाते.‘पठाण’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यात भगव्या रंगाचे अंतवर्स्त्र परिधान करून भगव्या रंगाचा अवमान केला आहे.
हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्यासाठी हे मुद्दाम केले गेले आहे. जे चित्रपट गृह हा चित्रपट प्रदर्शित करतील त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.अशी मागणी हिंदू धर्मियांच्या वतीने जयदीप चौधरी,मयुर चौधरी,रूपेश माळी,पंकज मराठे,विराज चौधरी,जय माळी,आनंद चौधरी,अविनाश चौधरी,खुशाल भोई,
जयेश राजपुत, दर्शन चौधरी,
क्रिष्णा जयस्वाल,क्रिष्णा चौधरी, राकेश माळी,गणेश माळी,नरेंद्र गवळी,जय महाले यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा