Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेगाव येथील पत्रकार व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे व्यक्तिमत्त्व असलेले,ज्ञानेश्वर ताकोते यांची ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड...!
शेगाव येथील पत्रकार व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे व्यक्तिमत्त्व असलेले,ज्ञानेश्वर ताकोते यांची ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड...!
शेगांव:(प्रतिनिधी) शेगाव येथील पत्रकार व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे व्यक्तिमत्त्व असलेले,ज्ञानेश्वर ताकोते यांची ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ,ही निवड राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रदेश बैठकी मध्ये किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी ,ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनात केली आहे.
मागील 18 वर्षापासून ज्ञानेश्वर ताकोते हे पत्रकारिते सोबतच, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्ञानेश्वर ताकोते यांनी शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय असे कार्य केलेले असून शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नासंबंधी आंदोलन असो किंवा शेतकरी हितासाठी झालेल्या आंदोलनात ज्ञानेश्वर ताकोते यांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे, नागपूर येथे ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय बैठकीला उपस्थित राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर ताकोते यांच्या याच कार्याची दखल घेऊन ,त्यांच्या खांद्यावर ओबीसी महासंघाचे कार्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्याचा आली असून त्यांना ओबीसी महासंघ जिल्हा अध्यक्ष पदावर एकमताने निवडण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा