Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ जानेवारी, २०२३
ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन...!
नंदुरबार, प्रतिनिधी दि.13 जानेवारी,
2023 जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी 123 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीमध्ये सरपंच पदाकरीता 394 उमेदवार व सदस्य पदाकरीता 2 हजार 456 असे एकूण 2 हजार 850 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे.
प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणूक काळातील निवडणूक खर्चाचा हिशेब २० जानेवारी २०२३ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब सादर न केल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये अपात्र करण्याची कारवाई करण्यात येईल.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी,असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री.सदगीर यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा