Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा गुरुदत्त कॉलनी या ठिकाणी बालिका दिवस उत्साहात साजरा...!



शिरपूर प्रतिनिधी:- शहरातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा गुरुदत्त कॉलनी या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिवसाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
         
 
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगरसेविका संगीता देवरे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका आशाताई बागुल, मीनाक्षी राठी, सरोज चावडा, भाग्यश्री पाटील, रेखा सूर्यवंशी तसेच मुख्याध्यापक गणेश साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
     
       
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व पुणे यांनी सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी इयत्ता चौथीची विद्यार्थी चंचल राकेश शिंपी येणे सावित्रीबाई फुले ची वेशभूषा साकारून आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे झाशीची राणी म्हणून यज्ञा मनोज पाटील व सावित्रीबाई फुले म्हणून जानवी संजय पाटील व नव्या संदिप वरसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर आपल्या अध्यक्ष भाषणात संगीताताई देवरे यांनी सावित्रीबाई फुले व आजच्या काळातील स्त्रीयांचे तुलना करून समाज व्यवस्थेवर प्रकाश झोत टाकला.
              
बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात संगीत खुर्ची, पाठीला फुगा लावून चालणे, थर्माकॉलचे मनी स्ट्रॉने उचलणे, बुक बॉल बॅलेन्स या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
             
संगीत खुर्ची मध्ये ज्योती भारत भोई प्रथम, मीनल संजय सोनवणे द्वितीय, भाग्यश्री प्रवीण मोरे तृतीय.दुसऱी दुसरी स्पर्धा थर्माकोलचे मनी उचलणे यात कविता अमोल गीते प्रथम, दिपाली प्रशांत राजपूत द्वितीय तर राणी जयपाल जाधव तृतीय ,पाठीला फुगा लावून चालणे याच्यात प्रथम जोडी अश्विनी जगदीश पाटील आणि हर्षदा योगेश पाटील, द्वितीय जोडीत पवित्रा सुनील गिरासे आणि अंजली पाटील, बुक बॉल बॅलेन्स स्पर्धेत शितल अशोक खैरनार प्रथम तर हेमलता उमेश निकम द्वितीय आणि संध्या रवींद्र माळी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना लगेच शाळेकडून पारितोषिक प्रदान करण्यात आले.
       
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भिल तर आभार प्रदर्शन गोपाल वरसाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत सोनवणे, अलका गोराने, कृष्णा पावरा, मनीषा भदाणे, प्रवीण पाटील, प्रेरणा गोकुळ चारण, अश्विनी दादाभाऊ वाघ, प्रियंका संजय निकुंम, शितल दिलीप पावरा या आंतरवासितांनी शिक्षिकांनी देखील परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध