Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ जानेवारी, २०२३
माध्यमिक विद्यालय तांडा कुंडाणे शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी...!
दिपक पवार प्रतिनिधी धुळे ग्रामीण
भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले.यांची आज 193 वी जयंती.महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंती लाच बालिका दिन असेही म्हटले जाते.
धुळे तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तांडा कुंडाणे शाळेत महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटवणारी भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका आजीवन आपल्याला पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणारी साहित्यातील बावनकाशी रत्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी गावातून रॅली काढून जनजागृती देखील करण्यात आली व गावातील मुख्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी भाषणे करून व नारे देऊन साजरी करण्यात आले
काही काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे केले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती देत यावर्षेपासून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कु.चेतना रिकेश पवार हिने तर महात्मा फुले यांचा वेश धनश्री काशिनाथ पाटील या विद्यार्थ्यांनी केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका छाया दिलीप पाटील मॅडम ,संस्थेचे अध्यक्ष डी बी पाटील सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सोनवणे सर यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा