Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

विरार पूर्व येथील सहकार नगरमधील श्री हरबादेवी अपार्टमेंटमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा...!



मुंबई-अक्षय कदम:२६ जानेवारी २०२३ रोजी देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. देशासह राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे विरारच्या सहकार नगरमधील श्री हरबादेवी अपार्टमेंटमध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम सोसायटीचे सेक्रेटरी श्री. महेंद्र बबन शिगवण यांनी आलेल्या सर्व रहिवाश्यांचे स्वागत करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे,नेत्यांचे स्मरण करून त्यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर माननीय श्री. प्रकाश शंकर शिंदे (काका) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. नंतर ध्वजवंदन करण्यात आले व सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले.

स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या नेत्यांचे स्मरण व्हावे,त्यांना सोसायटीकडून आदरांजली अर्पण व्हावी व आपल्या देशाचा अभिमान या हेतूने प्रथमच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय सोसायटीने घेतला.या कार्यक्रमाला राजू कामत,कृष्णा करंबेळे,ओमकार करंबेळे,अरुण घाडे,पंकज झा,जयेश चिनकटे,विकी मंडलिक,भरथरी राम, कृष्णा विश्वकर्मा, प्रशांत गावडे, जयदीप शिंदे, विनय मंडलिक आणि बिल्डिंगमधील महिला व शाळेतील मुले उपस्थित होती.

श्री.महेंद्र बबन शिगवण यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करून देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाचा शेवट खाऊ वाटप करून करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध