Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
मानाचा दादा गणपती मंडळ व सर्व शाखीय भोई समाजातर्फे पत्रकार जीवन भोई व डॉ. योगेश वाडीले यांचा सन्मान...!
मानाचा दादा गणपती मंडळ व सर्व शाखीय भोई समाजातर्फे पत्रकार जीवन भोई व डॉ. योगेश वाडीले यांचा सन्मान...!
दोंडाईचा प्रतिनिधी- 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मानाचा दादा गणपती मंडळ व सर्व शाखीय भोई समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी साडेसहा वाजता भारतमाता प्रतिमापुजन व खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन लक्षण भोई यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांना भगवद्गीता भेट देत सन्मानित करण्यात आले. याचवेळी सुयशाबद्दल योगेश अंबालाल वाडीले (बी ए एम एस, एम डी आयुर्वेद) यांचादेखील श्री गणेश प्रतिमा भेट देत सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम हा नवाभोईवाडा,
ईच्छामणी गणपती मंदिराजवळ ठेवण्यात आला.या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संजय तावडे, कैलास वाडीले सर, भाजपचे सरचिटणीस भरतरी ठाकूर सर, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शैलेश सोनार,व्यापारी चतुर पाटील, राहुल कवाड,राज ढोले,शाम भावसार, नंदकिशोर वाडीले,जयवंत तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कैलास वाडीले सर, डॉ. योगेश वाडीले, शैलेश सोनार, जीवन भोई, यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रस्तावना अनिल वाडीले यांनी तर सुत्रसंचालन आप्पा लांबोळे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज रामोळे,प्रदीप भोई,सुनील वाडीले, संदीप रामोळे,जयेश तावडे, विठोबा कोळी,भूषण चौधरी,भरत निकवाडे, योगेश वडिले,कल्पेश वाडिले,जयेश मोरे,धनुभाऊ रामोळे,हर्षल वाडिले,
संदीप तमखाने,टायगर धनगर आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेेतले. कार्यक्रमाला नवाभोईवाडा व राणीपुरा परीसतील युवक, नागरिक उपस्थित होते.
यादरम्यान भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष देत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा