Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

अन्याय आत्याचार निवारण समिती तर्फे महिलांचा वृक्षवाटप आणि हळदी कुंकू समारंभ.सामाजिक कार्यकर्त्यां सौ.जोशील पगारिया यांचा प्रमुख उपस्थितीत सपन्न



धुळे दि.२६ जाने. धुळे जिल्हा अन्याय आत्याचार निवारण समिती तर्फे वृक्षवाटप आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शहरातील वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला होता.वृध्दाश्रमातील जेष्ठ मातांबरोबर तसेच विधुर,घटस्फोटित,निराधार माता भगिणींसह अन्याय आत्याचार निवारण समिती तर्फे वृक्षवाटप आणि हळदी कुंकू समारंभ धुळे जिल्हा व शहर महीला पदाधिकाऱ्यांनी हळदी कुंकू समारंभ संपन्न केला.याप्रसंगी सर्वाना हळदीकुंकू लेवून बाळवृक्ष कुंडीसह सप्रेम भेट देऊन पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.तसेच जिल्हाध्यक्ष सौ.जोशीलाताई पगारिया  यांसह  सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी आश्रमातील गरजू वयोवृद्धांना  साबण,टुटपेस्ट,खोबरे तेल,बॉडीलोशन ईत्यादी अत्यावश्यक सामानाची मदत केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रोफेसर श्रीमती प्रेमलताताई जाधव होत्या. प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई परदेशी,हर्षीताताई पाटील ह्या उपस्थित होत्या.सर्वप्रथम प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी निमित्ताने भारतीय संविधानाच्या प्रतिचे आणि भारतमाता,हिंदवी स्वराज्याच्या आद्य राजमाता जिजाऊ,सावित्रीमाई फुले,माता रमाई यांचे प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून प्रेमलताताई जाधव आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.तसेच वृध्दाश्रमातील जेष्ठांबरोबर हितगुज करुन घटस्फोटित निराधार परित्यक्ता महिलांमध्ये सामाजिक समता नांदावी म्हणून अ.आ.नि.स.च्या उद्देशातुन त्यांचे बरोबर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हळदीकुंकू समारंभात पार पाडला.यावेळी धुळे जिल्हाध्यक्षा जोशीलाताई पगारिया,सुनीताताई सोनार,ललिता शिरसाठ,सारिका सुर्यवंशी,सुनीता परदेशी,उज्वला पगारे,नंदा केदारे,छाया पाटील,मालती सुर्यवंशी,सरला निकम,माधुरी निकम,नंदा मेश्राम,संगीता पाटील,वैशाली भावसार,भाग्यश्री विभांडीक,अलका कापुरे,अनुरक्त विभांडीक,लुब्धा सुर्यवंशी,अश्विनी सोनार आदींसह मोठ्या संख्येने महीला भगिनी उपस्थित होत्या.सुत्रासंचालन सुनीता सोनार,सुनिता शिरसाट यांनी तर आभार मालती सूर्यवंशी यांनी मानले.या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कारासह संगीत खुर्चीसह विविध स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध