Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील मलांजन येथे धाडसी चोरी सुमारे तीन लाखाचा शेती उपयुक्त ट्रॅक्टर अवजारांचा मुद्देमाल लंपास
साक्री तालुक्यातील मलांजन येथे धाडसी चोरी सुमारे तीन लाखाचा शेती उपयुक्त ट्रॅक्टर अवजारांचा मुद्देमाल लंपास
साक्री तालुक्यातील मलांजन येथे आज मध्यरात्री शेतकऱ्यांचा गावाजवळील खळवाडीतुन तीन लाखाच्या ट्रॅक्टरच्या शेती अवजारांची धाडसी चोरी करण्यात आली.श्री देविदास उत्तम सोनवणे मु.पो.मलांजन ता.साक्री.जि.धुळे यांचा मालकीचा गावाजवळील खळवाडीतून ही चोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले यात सुमारे 3 लाखाचा मुद्देमाल चोरट्याने पळून नेला त्यात एक रोटावेटर एक ट्रेलर,एक ट्रॅक्टर ची बॅटरी,तसेच पिस्टन पंप व चार जाळीचे बंडल अशी एकूण तीन लाख मुद्देमाल चोरट्यानी पळून नेला आहे सदर घटनेची साक्री पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन घटनेची संपूर्ण पाहणी केली यावेळी गावातील जेष्ठ नागरिक सरपंच परीक्षित सोनवणे पोलीस पाटील किशोर मराठे व संबंधित शेतकऱ्यांला धीर देऊन लवखच झालेल्या घटनेचा तपास पी एस आय अहिरे याचा कडून करण्यात येईल असे आश्वासन दिले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक साहेबांनी आपल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना तशा सूचना देऊन तपासाला गती देऊन लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान साक्री पोलीस प्रशासना समोर खडे टाकले आहे असे प्रतिपादन केले. साक्री तालुक्यातील वाढत्या शेतीमालाच्या व कृषी अवजारांच्या चोऱ्या लक्षात घेता ही तालुक्यात ही तिसरी मोठी धाडसी चोरी असल्याचे निदर्शनास आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा