Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

साक्री तालुक्यातील मलांजन येथें धाडसी चोरी काल मध्यरात्री शेती उपयोगी अवजारांची तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी



मलांजन ता. साक्री येथे रोज रात्री शेतकर्यांच्या शेतातून विहिरीतून मोटर, ट्रॅक्टर सोबत असलेले शेत अवजार व शेतकरींनी पिकवलेलं पीकांची चोरी होत असून तसेच तालुक्यातील काही गावांना देखील अशीच परिस्थिती आढळून येत असल्यामुळे आज साक्री पोलीस स्टेशन येथे मलांजन येथील श्री देविदास उत्तम सोनवणे व मलांजन ग्रामस्थ यांनी साक्री पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. व इतर गावातील ग्रामस्थ येऊन यांनी देखील तक्रार दाखल केली असून या वेळी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा श्री संजय बोरकुंड साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री किशोर काळे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी मा श्री प्रदीप मैराळे साहेब, साक्री पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. श्री रवींद्र देशमुख साहेब यांना साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय ताईसाहेब मंजुळा गावित यांनी सूचना करून लवकरात लवकर सदर घटनेचा तपास करण्याच्या सूचना दिल्या......यावेळी सोबत उपस्थित तालुक्यातील शेतकरी मलांजनचे पो.पा.मराठे,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी पंकज भामरे, भाडणे ता साक्री येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे,धाडणे येथील प्रगतिशील शेतकरी पप्पू दादा ठाकरे,व ग्रामस्थ उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध