Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट श्रीमान स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भगवा सप्ताह !
शिरपूर शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट श्रीमान स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भगवा सप्ताह !
शिरपूर प्रतिनिधी:आज दिनांक-२३ जानेवारी २३ रोजी हिंदुहृदयसम्राट श्रीमान स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बाळासाहेबाना अपेक्षित ८०% टक्के समाज कारण व २०% टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार भगवा सप्ताहचे प्रारंभ गोरगरीब उघड्यावर राहणाऱ्या शिरपूर शहरातील गरजू लोकांना चादरी वाटप करण्यात आले.तसेच दैनिक मार्मिक निशाणा दिनदर्शिका २०२३ लोकार्पण करण्यात आले.तसेच ग्रामीण भागात बभळाज,
हिंगोणीपाडा,करवंद ,लौकी व तालुक्यातील इतर ठिकाणी ऊसतोड मजुरांना चादरी वाटप व तालुक्याभरात विविध स्पर्धा व बक्षिस वितरण व विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.अशी माहिती उपजिल्हा प्रमुख-भरतसिंग राजपूत ह्यांनी दिली.
ह्याप्रसंगी शिवसेना
उपजिल्हा प्रमुख-भरत भाऊ राजपूत,उपजिल्हा संघटक-विभाभाई जोगराणा,एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष-राजू टेलर,मा.उपजिल्हा प्रमुख-हिंमत महाजन,तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा, विधानसभा क्षेत्र प्रमुख-छोटूसिंग राजपूत,तालुका संघटक-योगेश सुर्यवंशी,तालुका संघटक-मुकेश शेवाळे,उपतालुका प्रमुख-अभय भदाणे,मंगलसिंग भोई,मा.उपतालुक प्रमुखराजेश गुजर,शहर समन्वयक-देवेंद्र पाटील,युवासेना उपजिल्हायुवाधिकारी-अनिकेत बोरसे,युवासेना तालुका युवाधिकारी-विजय पावरा,उप युवाधिकारी-जितेंद्र राठोड,महा.वा.सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,
मा.शहराध्यक्ष महा.वा.सेना.दिनेश गुरव ,मा.तालुकाध्यक्ष.नन्ना जाधव,पिंटू शिंदे,विकास सेन,बबलू शेख,रेहान काझी,दिपक राजपूत,रोहित चौधरी,जगदिश चौधरी,राज सिसोदिया,ईश्वर मोरे,एन.डी.
पवार,सचिन चौधरी,ईश्वर राठोड,नीरज राजपूत,ऋषिकेश राजपूत,आबा भिसे,देवा बंजारा,हिरालाल ठेलारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा