Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे पोलिस भरतीत तृतीयपंथीचा अर्ज..! तृतीयपंथीयांचा समाजातील मानाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी सन्मानाने शासकीय सेवेत स्थान..! प्रथमच खाकीमध्ये दिसणार तृतीयपंथी;
धुळे पोलिस भरतीत तृतीयपंथीचा अर्ज..! तृतीयपंथीयांचा समाजातील मानाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी सन्मानाने शासकीय सेवेत स्थान..! प्रथमच खाकीमध्ये दिसणार तृतीयपंथी;
धुळे प्रतिनिधी : तृतीयपंथीयांचा समाजातील मानाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी सन्मानाने शासकीय सेवेत स्थान देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर पोलिस दलात तब्बल ११६ वर्षात प्रथमच चाँद उर्फ बेबो पार्वती जोगीच्या रुपाने तृतीय पंथियाने पोलिस भरतीसाठी आव्हान दिले आहे.
पोलीस भरतीत देखील आता तृतीयपंथीयांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.खाकीमध्ये देखील आता तृतीयपंथी बंदोबस्ता दरम्यान इतर पोलीस बांधवांप्रमाणे दिसून येणार असल्यामुळे आता तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा नक्कीच बदलेल.धुळ्यात 42 पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेत चाँद उर्फ बेबो पार्वती जोगी यांनी पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
वर्षभरापासून सराव
जळगाव जिल्हयातील रहिवाशी असलेल्या चाँद तडवी उर्फ बेबो पार्वती जोगीने धुळ्यातून अर्ज दाखल केला आहे.भुसावळ येथील तृतीयपंथी चाँद सरवर तडवी (वय 27) च्या रुपाने यंदाची भरती वेगळी ठरणार आहे.पोलिस भरतीसाठी सुमारे वर्षभरापासून चाँद तयारी करत होती. मैदानी सरावासोबत अभ्यासावरही चाँदने लक्ष केंद्रीत केले आहे.सराव व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर चांद पोलीस भरतीत उतरणार आहे.पोलिस झाली तर समाज सेवेलाच प्राधान्य राहील.शिवाय तृतीयपंथीयांचा सन्मान अधिक वाढवण्याचा मानस चाँदचा असणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा