Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

डाळींब - हृदयमित्र



डाळींब आपल्याकडे मुबलक प्रमाणात ऊपलब्ध असते.आयुर्वेदामधे डाळींब हे हृदयासाठी ऊत्तम फळ सांगितले आहे. ( हृद्य ) 
डाळींबावर आतापर्यंत विविध संशोधन झालेले आहे.त्यातूनही हेच सिद्ध केलय 
1. डाळींब हे रक्तवाहीन्यांसाठी प्रोटेक्टीव असे काम करते. म्हणजे ब्लॉकेजेस तयार होण्याच्या सुरूवातीच्या अवस्थेपासूनच काम करते. 
आणि म्हणूनच हृदयरोग्याने रोज डाळींब खावे.

2. डाळींब हे वारंवार लूज मोशन होणे किंवा ईरीटेबल बॉवेल सिंड्रोम यात ऊपयोगी आहे.

3.सूज येणार्या संधीवातातही डाळींब ऊपयोगी पडते. 

4.डाळींबांच्या पानामधे वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे.
असे बरेच गुण डाळींबात आहेत.

मग काय सुरू करा जेंव्हा मिळेल तेंव्हा डाळींब खायला.हां..मात्र डाळींब हे गोड आणि आंबट अश्या दोन प्रकारात मिळते.हायपरॲसिडीटी होत असेल तर फक्त आंबट डाळींबखाऊनये.
अन्यथा ताप ,खोकला ,सर्दी,असेल  पोट बिघडले असेल ,अपचन असेल , सांधेदुखी असेल हृदयरोग असेल ,बिपी ,डायबेटीस असेल...सर्वांनी डाळींब खा.

सोलून खा ,रस काढून खा.मात्र रस काढताना साखर मीठ घालू नका. 
ऊपाशी पोटी खा जेवणानंतर खा.
डाळींब खा आरोग्यपूर्ण राहा . 
Shatayu ayurvedic hospital
7020276058


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध