Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
कासारे येथे श्री.चंद्रकांत लोटनराव देसले व सौ.विश्वलता चंद्रकांत देसले हे "मातृ-पितृ सेवा" पुरस्काराने सन्मानित
कासारे येथे श्री.चंद्रकांत लोटनराव देसले व सौ.विश्वलता चंद्रकांत देसले हे "मातृ-पितृ सेवा" पुरस्काराने सन्मानित
साक्री प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील कासारे येथे जिल्ह्यात कुठल्याही गावात असा अविस्मरणीय प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी रोजी गावातील बाजारपेठेत सार्वजनिक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात कैलासवासीनी विमलबाई कृष्णाराव चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे दापत्य श्री.जयप्रकाश कृष्णराव बागुल,सौ. रत्नाबाई जयप्रकाश बागुल,श्री.प्रवीण जयप्रकाश बागुल, सौ.पल्लवी प्रवीण बागुल,कु.चेतन कुमार जयप्रकाश बागुल,श्री.आनंद जयप्रकाश बागुल, सौ.मंजुषा आनंद बागुल या बागुल कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मातृ-पितृ सेवा पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी हा पुरस्कार श्री.चंद्रकांत लोटनराव देसले व सौ.विश्वलता (नयना)चंद्रकांत देसले यांना देण्यात आला. 2007 मध्ये कै. लोटन नारायण देसले यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर 2 वर्ष श्रीमती.सुशिलाबाई लोटन देसले, श्री.चंद्रकांत लोटन देसले,सौ.विश्वलता चंद्रकांत देसले,श्री.जगदीश लोटन देसले,सौ.ज्योती जगदीश देसले, श्री.अनिल लोटन देसले,सौ.मनीषा अनिल देसले या दापत्यांनी आपल्या वडिलांची अहोरात्र सेवा केली.कै. लोटन नारायण देसले यांचे 25/01/ 2009 यावर्षी निधन झाल्यानंतर श्रीमती.सुशिलाबाई लोटन देसले यांची सेवा हे देसले कुटुंब अतिशय वाखाणण्याजोगे करीत आहे.त्यांच्या या अहोरात्र केलेला सेवाभाव लक्षात घेऊन बागुल कुटुंबीयांनी श्री.चंद्रकांत देसले व सौ. विश्वलता देसले यांना हा (मातृ पितृ सेवा पुरस्कार) देण्यात आला.सौ. विश्वलता देसले ह्या एक उत्कृष्ट सून, उत्कृष्ट वहिनी, उत्कृष्ट माता आहेत.
कासारे येथील बाजारपेठेत सार्वजनिक ध्वजारोहण या कार्यक्रमात श्री.चंद्रकांत देसले व सौ.विश्वलता देसले यांना व्यासपीठावरील श्री.जयप्रकाश कृष्णराव बागुल,सौ.त्नाबाई जयप्रकाश बागुल,श्री.प्रवीण जयप्रकाश बागुल, सौ.पल्लवी प्रवीण बागुल,गावाचे सरपंच सौ.सुवर्णा देसले, उपसरपंच श्री.राहुल देसले, व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत देण्यात आला.अशा या देसले आदर्श कुटुंबाला तमाम कासारे ग्रामस्थांच्यावतीने मानाचा मुजरा.पुरस्कार शाल, श्रीफळ, साडी व 1111 रुपये या स्वरूपात होता.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा