Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर असलेले नंदलाल शांताराम शिनकर यांनी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील नावाची दुरुस्ती करणे तसेच विद्यार्थ्याचे दहावीचे मार्कशीट घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सोळाशे रुपयाची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले नंदलाल शांताराम शिनकर यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तक्रारदार विद्यार्थी यांनी सन 2017 18 या वर्षी नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतले असून,त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी मुख्याध्यापकांकडे तक्रारदार विद्यार्थ्याने विनंती केली,
यावेळी मुख्याध्यापकांनी संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून घेणे व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कलिस्ट आणून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तदनंतर आज दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी,पोलीस निरीक्षक समाधान वाघ,पोलीस हवालदार विजय ठाकरे, अमोल मराठे,पोलीस नायक देवराम गावित यांनी लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहाळदे,पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याकडून सोळाशे रुपयाची लाच स्वीकारताना सुळी येथील मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून,नवापूर पोलीस स्टेशन येथे संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडून देण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या ...
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा