Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचा महसूल विभागातील खांबाळे गावचे तलाठी सहा हजाराची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत विभागाचा जाळ्यात...!
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचा महसूल विभागातील खांबाळे गावचे तलाठी सहा हजाराची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत विभागाचा जाळ्यात...!
शिरपूर प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महसूल विभागात खळबळ माजली असून तालुक्यातील खंबाडे शिवारातील तलाठी हे सहा हजार रुपयाची लाच स्वीकारली म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून पडताळणी अंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.
शेतीच्या सातबाऱ्यावर वारसदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी सुऱ्या पायल्या कोकणी याला धुळे येथील अँटी करप्शन ब्यूरोने 31 जानेवारीला दुपारी ताब्यात घेतले.
या प्रकरणातील तक्रारदार हे खंबाळे येथील रहिवाशी असुन त्यांच्या वडीलांच्या नावे खंबाळे येथे गट नं. 44/2अ अशी शेत जमीन आहे. वडील 2017 मधे मयत झाले असून त्यांचे नावावर असलेल्या शेत जमिनीस काही कारणास्तव वारस लावण्याचे राहुन गेले होते. सदर शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावर वारस लावण्याकरीता त्यांनी मौजे खंबाळे येथील तलाठी सुऱ्या कोकणी यांची भेट घेतली असता तलाठी कोकणी यांनी तक्रारदार यांना वारस लावण्याचा आवश्यक कागदपत्रासह अर्ज व त्या सोबत सात हजार रुपये घेवुन ये असे सांगितले. तक्रारदार यांनी धुळे एबीसीच्या कार्यालयातील अधिकाऱ्याकडे तक्रार केली.पथकाने शिरपूर येथे 18 जानेवारीला तक्रारदार यांची भेट घेवुन तक्रार नोंदवून घेतली.
तक्रारीची पडताळणी केली असता सुऱ्या कोकणी यांनी मोहिदा गावात तक्रारदाराकडे साक्षीदाराच्या समक्ष सात हजार रुपयांची व नंतर तडजोडीअंती सहा हजार रुपयांची मागणी केली होती.तलाठी सुऱ्या कोकणी याला लाच स्विकारतेवेळी संशय आल्याने लाच न स्विकारता मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरकडे निघून गेला.त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण,पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,हवालदार राजन कदम, शरद काटके,संतोष पावरा,रामदास बारेला,भुषण खलाणेकर,भुषण शेटे, गायत्री पाटील,संदीप कदम,प्रशांत बागुल,प्रविण पाटील,रोहीणी पवार, वनश्री बोरसे,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा