Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

स्टेट बँकेतील खाते ब्‍लॉक झाल्‍याचा संदेश ; शिरपूर येथील शिक्षकाची पावणेपाच लाखाची फसवणूक



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर स्टेट बँकेतील खाते ब्लॉक झाल्याचा संदेश पाठवून शिक्षकाची पावणेपाच लाख रुपयांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.ही घटना २० जानेवारीला रात्री घडली.शिक्षक संजय भिकनराव पाटील (वय ५१, रा. पद्मावतीनगर,शिरपूर) यांच्यासोबत हा प्रकार घडला.

शिरपूर शहराती संजय पाटील यांना २० जानेवारीला ८९८७५३३८७४ या मोबाईलवर क्रमांकावरून संदेश पाठवण्यात आला.त्यात त्यांचे एसबीआयमधील अकाउंट ब्लॉक केले असून,आपले पॅनकार्ड अपडेट करा व केवायसी पूर्ण करा,असे नमूद करून लिंक दिली होती.पाटील यांना लिंकद्वारे पुढील प्रोसेस करण्यास सांगण्यात आले.

लिंक ओपन करताच

त्याचदरम्यान त्यांच्या शिरपुरातील स्टेट बँकेतील अकाउंटमधून चार लाख ८७ हजार ३४७ रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांची फसवणूक झाल्याने निष्पन्न झाले.त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे येथील सायबर पोलिस ठाण्यात निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध