Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
सटाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश
सटाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश
मालेगांव - दि.06/01/2023 - मा.ना. दादाजी भुसे, बंदरे व खनिकर्म मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या उपस्थित सटाणा तालुक्यातील वरचे टेंभे, तळवाडे भामेर व आव्हाटी ग्रामपंचायत मधिल सरपंच व सदस्यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला.
ना.भुसे यांचे हस्ते सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शाल, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. ना.भुसे यांनी सर्व सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करुन गावाचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरचे टेंभे ग्रामपंचायत मधिल सरपंच किरण (जी) वाघ यांचे समवेत सदस्य वसंत वाघ, हर्षाली वाघ, शोभाबाई आहिरे, सुरेखा आहिरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश केला.तसेच तळवाडे भामेर ग्रामपंचायत मधिल सरपंच दिनेश गायकवाड यांचे समवेत सदस्य दिलीप बोरसे, चैत्राम मोरे, लक्ष्मण जाधव, यमुनाबाई माळी, सखुबाई पवार, मनिषा हादगे, इंद्रायणी गायकवाड यांनी बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश. त्याचप्रमाणे आव्हाटी ग्रामपंचायत मधिल सरपंच शोभाबाई भामरे यांचे समवेत सदस्य सुमनबाई भामरे, दगुबाई भामरे, अरुणा भामरे, लक्ष्मी भामरे, राजेंद्र पिंपळसे, शिवाजी सोनवणे यांनी बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय दुसाणे, तालुकाप्रमुख मनोहर बापु बच्छाव, महानगरप्रमुख विनोद वाघ, सरपंच दाभाडी प्रमोद निकम, निळकंठ निकम, विनोद जाधव, रमेश जिभु पवार, विनोद जाधव, प्रविण भामरे, देवा भामरे, किरण पवार, लोकेश घुगे, राका शहा, सागर भदाणे, मंगेश नेरे आदि शिवसैनिक, युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
-----*****-----
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा