Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

चोराच्या उलट्या बोंबा निकाल लागेपर्यंत नाव, फोटो छापू नका अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदनातून साकडे



हा न्याय सगळ्याच गुन्ह्यात लावायचा का? हा पर्याय आहे का? खरेतर ही मागणी कोर्टात करायला हवी होती, मग कोर्टाने योग्यप्रकारे समजावले असते!
 
आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करावा!

दर महिन्याला किमान २५ ते ३० सत्कारमूर्ती अगदी सहजपणे मिळतील,राज्याच्या प्रगतीमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या अडचणी कमी होण्यात यांचा बहुमूल्य वाटा आहे, याची नोंद घ्यावी!

आणि हो, कोणताही लाचेचा सापळा लावण्यापूर्वी, लाचलुचपत विभाग त्याची पडताळणी करते, लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतरच धाड टाकून पकडले जाते!

खरे तर लाच का घेतली जाते, ती घेऊ नये म्हणून काय करायला हवे या आणि अशा उपाय योजना सांगणे आवश्यक असताना,चक्क आमची नावे जाहीर करू नये असे बोलणे,म्हणणे आणि सांगणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा झाल्या!


Devendra Fadnavis 
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध