Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन्ननोती अभियान पंचायत समिती साक्री व युनियन बँक ऑफ इंडिया पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा बँक कर्ज मेळावा पिंपळनेर येथे संपन्न



आज दिनांक 12/01/2023 रोजी महराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन्ननोती अभियान व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांचा बँक मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मिळव्यात श्री संतोष पगारे तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती साक्री यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना बचत गटांनी घातलेल्या कर्जावरील व्याज अनुदान कसे मिळते हे समजावून सांगितले  गटांना बँक 7 टक्के व्याजदर आकारते त्यातुन उमेद अभियानाच्या माध्यमातून 3 टक्के व्याज गटांच्या कर्ज खात्यावर परत मिळते तसेच मिळालेल्या कर्जातून गटातील महिलांचे जीवनमान कसे उंचवता येऊ शकते हे त्यांनी उदाहरणातून पटवून दिले तसेच श्री उदय पाटील शाखा व्यवस्थपक यांनी प्रधान मंत्री जिवन सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजने विषयी मार्गदर्शन केले तसेच कर्जाची परतफेड वेळेवर करण्याचे काय फायदे आहेत हे समजावून सांगितले  व 54 गटांना 82 लाख कर्ज मंजूर केल्याचे  त्यांनी सांगितले तसेच श्रीमती प्रीती मॅडम शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना महिलांनी घेतलेल्या कर्जाची जाण पुरुषा पेक्षा जास्त असते महिला घेतलेल्या कर्जाचे चांगल्या प्रकारे वापर करतात अश्याच प्रकारे महिलांनी पुढाकार घ्यावा व आपले जीवनमान उचवावे व आपला उद्योग व्यवसाय वाढवावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतेश खोब्रागडे यांनी केले तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती उदय पाटील शाखा व्यवस्थापक ubi पिंपळनेर श्रीमती प्रिती मॅडम शाखा व्यवस्थापक cbi समोडे श्री संतोष पगारे तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती साक्री सुभाष धवन ubi पिंपळनेर श्री संदीप बोरसे तालुका व्यवस्थापक श्री रवींद्र गांगुर्डे तालुका व्यवस्थापक श्री अनिल कुवर अंगद राठोड पुरुषोत्तम बाविस्कर नितेश खोब्रागडे प्रभाग समनव्यक यांची प्रमुख उपस्थिती होती तर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती  मिरा बेमुस्कर सिमा चौधरी कल्पना मुसळे सर्व crp पिंपळनेर सफिरा ताई बँक सखी ubi पिंपळनेर मनिषा सोनवणे बँक सखी sbi पिंपळनेर व श्रीमती शितल पगारे  महिला प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध