Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
रेल्वेमंत्री ना.वैष्णव,राज्यमंत्री ना.दानवे यांचे आभार, मुंबई सेंट्रल-भुसावळ नविन एक्सप्रेस रेल्वे सुरु,नरडाणाहुन मुंबईला जाण्यासाठी सोईचे प्रवाशांनी लाभ घ्यावा - अरुण धोबी
रेल्वेमंत्री ना.वैष्णव,राज्यमंत्री ना.दानवे यांचे आभार, मुंबई सेंट्रल-भुसावळ नविन एक्सप्रेस रेल्वे सुरु,नरडाणाहुन मुंबईला जाण्यासाठी सोईचे प्रवाशांनी लाभ घ्यावा - अरुण धोबी
शिरपूर प्रतिनिधी : खान्देशातुन पश्चिम रेल्वेने मुंबई जाणार्या खान्देश एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर ही रेल्वे दररोज व्हावी अशी मागणी सातत्याने होत होती. माजीमंत्री आ.जयकुमार रावल,खा.डॉ. सुभाष भामरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना.अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली होती.
शिवाय शिरपूर येथील व्यापारी व जनतेच्या वतीने धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी हि या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांची जालना येथे (दि.१२ नोव्हेंबर) रोजी भेट घेवुन निवेदन देवुन मागणी केली होती. तर केंद्रीय रेल्वेमंत्री ना.अश्विनी वैष्णव यांचाकडे पत्र पाठवुन मागणी केली होती.व सतत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांचाकडे संपर्क करुन पाठपुरावा करीत होते. आता हि रेल्वे (दि.११ जानेवारी) पासुन मुंबई सेंट्रलहुन तीन दिवस रेल्वे सुरू करण्यात आली आहे.
भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या प्रचंड प्रतिसादामुळे तमाम खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी होती. खान्देश एक्स्प्रेस सोबतच आता नविन मुंबई सेंट्रल ते भुसावळ ०९०५१ व भुसावळ ते मुंबई सेंट्रल ०९०५२ हि गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि. ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
या गाडीचा शिरपूर व परिसरातील व्यापारी, प्रवाशांसाठी नरडाणा रेल्वे स्टेशनवरुन मुंबई व भुसावळ जाण्या येण्यासाठी सोईचे असुन नरडाणा येथुन या नविन गाडीचा प्रवास करण्याचा लाभ घ्यावा.असे आवाहन धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांचे जनतेच्या वतीने धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी आभार व्यक्त केले आहे. सदर गाडी रविवार, मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासा दरम्यान बोरीवली,भोईसर,वापी, बलसाड, नवसारी,चलथान,बेस्तान, बिने,बारडोली, व्यारा,नवापुर,नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा इ ठिकाणी थांबुन सकाळी ९.४३ मि. नरडाणा येथे थांबेल व पुढे दुपारी भुसावळ येथे पोहोचेल. सोमवार बुधवार व शनिवारी सायं ५.४० मि. भुसावळ येथुन सुटेल जळगांव, पाळधी, धरणगांव, अमळनेर येईल व साय. ७.४४ मि. नरडाणा येथे थांबेल, पुढे ८.वा. शिंदखेडा, रात्री ८.१८ मि. दोंडाईचा येथुन सुटेल तर पुढे नंदुरबार, नवापुर, व्यारा, बारडोली, बिने, बेस्तान, चलथान, नवसारी, बलसाड, वापी, भोईसर, बोरीवली येथे थांबा देण्यात आलेला आहे.
तर मुंबई सेंट्रल येथे पहाटे ५.३० वाजेला पोहचेल. तरी सदर गाडीचा शिरपूर व परिसरातील व्यापारी, प्रवाशांसाठी नरडाणा रेल्वे स्टेशनवरुन मुंबई व भुसावळ जाण्या येण्यासाठी सोईचे असुन नरडाणा येथुन या नविन गाडीचा प्रवास करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा