Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांची मोठी कारवाई....अवैधरीत्या स्पिरीटची चोरी करणाऱ्यांना केले जेरबंद....
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांची मोठी कारवाई....अवैधरीत्या स्पिरीटची चोरी करणाऱ्यांना केले जेरबंद....
शिरपूर प्रतिनिधी:मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 03 हॉटेल अन्नपूर्णा जवळ मौजे पळासनेर ता शिरपूर जि धुळे येथे टँकर मधून अवैधरीत्या स्पिरीटची चोरी करणाऱ्यांना केले जेरबंद...राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांची मोठी कारवाई.मा.आयुक्त,डॉ.श्री व्ही.एन.सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई,श्री सुनील चव्हाण,संचालक दक्षता व अंमलबजावणी, राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री.अर्जुन ओहोळ,विभागीय उपायुक्त नाशिक विभाग राज्य उत्पादन शुल्क नाशिक आणि अधिक्षक श्री.मनोज शेवरे राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कशिरपूर विभागाच्या पथकाने 8 फेब्रुवारी बुधवार रोजी मौजे पळासनेर ता शिरपूर जि धुळे येथे रात्रीची गस्त घालत असताना संशयित असलेले वाहन HR 37 D 0076 या 35000 ब.लि स्पिरीट ने भरलेला टँकर सह आयशर 06 चाकी क्रं MH 18 AA 502 ची तपासणी केली असता या मध्ये 250 ली चे एकूण 06 प्लास्टिक ड्रम स्पिरीट ने भरलेले झडती अंती मिळून आले टँकर ड्राइव्हवर कडून अधिक चौकशी केली असता त्याने GREAT GALLEON DISTILLERY DIST DHAR M.P येथून DEVICOLAM DISTILLERY ,KERLA या ठिकाणी घेवून जाण्यासाठीचे आयात निर्यात वाहतुक पास पळताळणी अंती मिळुन आले. दोन वाहने v 1375 लि स्पिरीट सह 53 लाख 40 हजार 275रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दीपक मनिब प्रशाद याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर कारवाईचा पुढील तपास श्री एस.एस.हांडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर हे करत आहेत सदर कार्यवाहीत निरीक्षक श्री बी. एस. महाडीक,सीमा तपासणी नाका हाडाखेड, दू.नि श्री बी.एस.चोथवे, श्री.प्रकाश अहिरराव,स.दु.नि श्री अनिल निकुंबे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान श्री एस एस.देवरे, गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे,मनोज धुळेकर,जितेंद्र फुलपागरे,अमोल धनगर, दारासिंग पावरा, वाहन चालक निलेश मोरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा