Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री महोदयांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 270 उमेदवारांना मिळणार नियुक्तीचे आदेश



नाशिक जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात सेवेतन असताना आकस्मित निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसदारांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु अनेक विभागांमध्ये पात्र उमेदवार असतानाही नियुक्ती आदेश देताना दिरंगाई होत आहे, हे माननीय नामदार दादाजी भुसे यांच्या निदर्शनास आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांची तातडीने बैठक घेऊन अनुकंपा धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील 270 पात्र उमेदवारांना विविध शासकीय विभागातील गट क व ड पदाचे नियुक्ती आदेशाचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11:30 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांची शुभहस्ते होणार आहे. यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपा धारक पात्र उमेदवारांना लाभ होणार आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध