Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे लोकसभा खा.डॉ.सुभाष भामरेंच्या प्रयत्नांने मनमाड-इंदूर रेल्वेमार्गचे स्वप्न साकार,पहिला टप्पा बोरविहीर-नरडाणा रेल्वेमार्गासाठी 100 कोटी रुपये मंजूर,अमृत भारत स्टेशन स्कीम योजनेतून धुळे रेल्वेस्टेशनचेही होणार अत्याधुनिक सुशोभिकरण
धुळे लोकसभा खा.डॉ.सुभाष भामरेंच्या प्रयत्नांने मनमाड-इंदूर रेल्वेमार्गचे स्वप्न साकार,पहिला टप्पा बोरविहीर-नरडाणा रेल्वेमार्गासाठी 100 कोटी रुपये मंजूर,अमृत भारत स्टेशन स्कीम योजनेतून धुळे रेल्वेस्टेशनचेही होणार अत्याधुनिक सुशोभिकरण
धुळे - तमाम धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचा जिव्हाळ्याचा मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग साकारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेले लोकप्रिय खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय बजेटमध्ये पहिला टप्पा बोरविहीर ते नरडाणा या रेल्वेमार्गासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. योग्य पाठपुरावा आणि प्रयत्नातून मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात येत आहे. तसेच केद्र सरकारच्या महत्वकांक्षी अमृत योजनेतून देशातील 300 रेल्वेस्टेशनचे अत्याधुनिकीकरण होणार आहे, त्यात सुध्दा धुळे रेल्वेस्टेशनचा समावेश करुन घेण्यात खासदार डॉ.सुभाष भामरे यांना यश आले आहे. त्यामुळे धुळे रेल्वेस्टेशन देखील कात टाकून अत्याधुनिक पध्दतीने सुशोभित आणि सर्व सुविधांनी सज्ज होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली आहे.
नुकताच केंद्रातील भाजपा प्रणित सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक 2 लाख 40 हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. यात महाराष्ट्राच्या वाटेला देखील 1300 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची मााहिती खुद्द रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी दिली. याच अर्थसंकल्पात धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मिळालेल्या निधीची सविस्तर माहिती खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, धुळे मतदारसंघात सर्वात महत्वाचा मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आहे, या मार्गाला मंजूरी मिळवून घेत त्याचे प्रत्यक्षात काम सुरु करुन घेण्यासाठी मी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. त्या प्रयत्नांमुळेच मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला मंजूरी मिळाली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आधी धुळे तालुक्यातील बोरविहीर ते नरडाणा असा 50 कि.लो. मिटर लांबीचा रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भुसंपादनाचे काम सुरु असून ते अंतिम टप्प्यात देखील आले आहे. आता प्रत्यक्ष रुळ टाकणे आणि रेल्वेमार्ग तयार करणे यासाठी निधीची आवश्यकता असल्याने तो निधी मिळवण्याचा प्रयत्न दिल्लीत सुरु केला, केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचे बजेट मंजूर केले जाते, त्यामुळे मी रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेवून त्यांना बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भरुन आर्थिक तरतूर करावी अशी मागणी केली. त्या मागणीला आाणि केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळून सन 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी मंजूर केलेल्या बजेटमध्ये बोरविहीर ते नरडाणा या 50 कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 100 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.
बोरविहीर-नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामासंदर्भातही खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे की, बोरविहीर ते नरडाणा हा रेल्वेमार्ग मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचाच एक भाग असून तो पहिला टप्पा असल्याने त्याचे काम वेगाने पुर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यातूनच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु करीत ती आता अंतिम टप्प्यात आली आहे, जमीन संपादन झाले कि त्वरीत रेल्वे रुळ टाकण्यासह रेल्वेमार्ग निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
रेल्वेमार्ग तयार करतांनाच केंद्र सरकारच्या नविन अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत धुळे रेल्वेस्टेशनच्या अत्याधुनिक सुशोभिकरणासाठी देखील भरघोस असा निधी मंजूर करुन घेतला असल्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले. अमृत भारत स्टेशन स्कीम विषयी अधिक माहिती देतांना खासदार डॉ.सुभाष भामरे म्हणाले की, केंद्र सरकारने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विशेष अशी अमृत भारत स्टेशन स्कीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे, यात देशभरातील 300 रेल्वेस्टेशनची निवड करण्यात आली आहे. यात आपल्या धुळे रेल्वेस्टेशनचा समावेश करुन घेण्यासाठी मी पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळाले आहे. अमृत भारत स्टेशन स्कीम मध्ये समावेश झाल्याने धुळे रेल्वेस्टेशनचे अत्याधुनिक अशा स्वरुपात सुशोभिकरण आणि निर्माण कार्य होईल. यात रेल्वे स्टेशनचे संपुर्ण रुपडेच पालटणार आहे, त्यामुळे धुळेकरांना नविन बोरविहीर-नरडाणा रेल्वे मार्गासोबतच नविन अत्याधुनिक अशा सुविधांनी सुसज्ज असे धुळे रेल्वे स्टेशन देखील मिळणार आहे. त्यामुळेच रेल्वे बजेटमध्ये धुळेकरांच्या अपेक्षांना पुर्ण करीत बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी 100 कोटी रुपयांचा भरघोस असा निधी दिल्याबद्दल आणि अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत धुळे रेल्वेस्टेशनचा समावेश केल्याबदद्ल देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहाजी, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमणजी तसेच रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी, रेल्वेराज्य मंत्री ना.रावसाहेब दानवेजी तसेच महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मी आभार मानतो. असेही खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा