Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर येथील राहुल भोई खून प्रकरणी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अक्कलकुवा तालुका भोईसमाज सेवा संघाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन...



नंदूरबार(प्रतिनिधी):-शिरपूर (शिंगावे) येथील भोईसमाजातील तरुण चि.राहुल राजू भोई यांच्यावर दि.4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरात प्राणघातक हल्ला करत ठार मारून खून केल्या प्रकरणी गुंड प्रवृत्तीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत अक्कलकुवा तालुका भोईसमाज सेवा संघाच्यावतीने तहसीलदार अक्कलकुवा,पोलीस निरीक्षक अक्कलकुवा तसेच महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा भोईसमाज सेवा संघ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाडीले,रविंद्र वानखेडे,अमृत तावडे, किशोर ढोले,राजाराम नुक्ते,भगवान मोरे,लक्ष्मण मोरे,रवी सोनवणे, केतन वाडीले, योगेश साठेसह भोईसमाज बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध