Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर शहरातील अंबिकानगर मधील पाण्याच्या टाकीजवळ 28 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना....



शिरपुर प्रतिनिधी: –शिरपुर  शहरातील अंबिकानगर मधील पाण्याच्या टाकीजवळ 28 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.मनोज प्रकाश चव्हाण वय 28 रा.अमोल बिल्डिंग शिवनगरी अंबिकानगर पाण्याची टाकी जवळ शिरपूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी दाखल होत गळफास घेतलेल्या युवकाचा मृतदेह उतरवून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी हलविला. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मनोज चव्हाण हा 28 वर्षीय युवक सेंटिंग काम करत असून 21 फेब्रुवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी दाखल होत गळफास घेतलेल्या युवकाचा मृतदेह उतरवून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी हलविला.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मनोज चव्हाण हा 28 वर्षीय युवक सेंटिंग काम करत असून 21 फेब्रुवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कामावरून घरी आला असता आईला जेवण बनविण्यास सांगून घराबाहेर बसण्यास सांगितले आणि दरवाजा बंद केला.सदर तरुणाने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेतल्याचे चर्चिले जात आहे. मयत युवकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून पुढील कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध