Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिवव्याख्यानात बाधा आणणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडेचा धुळे जिल्हा युवासेनेकडून जाहीर निषेध !
शिवव्याख्यानात बाधा आणणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडेचा धुळे जिल्हा युवासेनेकडून जाहीर निषेध !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या शिवव्याख्यानात व्याख्याते तुषार उमाळे व्याख्यान देत असतांना व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मुजोर खासदार अनिल बोंडे यांना शिवरायांबद्दल भाषण सहन न झाल्याने त्यांच्याकडून व्याख्यात्याना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान व्हावा हीच भारतीय जनता पक्षाचे संस्कृती आहे, महाराजांचे महत्व महाराष्ट्रातून संपुष्टात यावे असा दुष्ट हेतू भाजपच्या नेत्यांचा आहे. माजी राज्यपाल कोशारी यांनी शिवरायांचा अपमान केला होता, तरी भाजपच्या वतीने साधी विरोधाची भूमिका देखील घेण्यात आली नव्हती.
त्याच पद्धतीने आता शिवव्याख्याते यांचे भाषण रोखून एक प्रकारे पदाचा, सत्तेचा गैरवापर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम भाजपचे लोकप्रतिनिधी वेळोवेळी करतांना दिसत आहेत.
धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने शिवव्याख्याते मा.तुषार उमाळे यांचा भर व्यासपीठावर अपमान करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे याच्या प्रतिमेला जोडे मारत जाहीर निषेध करण्यात आला, तसेच खासदार अनिल बोंडे यांनी शिवव्याख्यात्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त व शिवप्रेमी आक्रमक होतील असा इशारा युवासेना धुळे जिल्हा पदाधिकारी यांनी दिला आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरीष माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, अमित खंडेलवाल, योगेश मराठे, सिद्धेश नाशिककर, वैभव चव्हाण,निलेश चौधरी,भूषण चौधरी, सोमेश कानकाटे, जयेश फुलपगारे, आमीन शेख, मनिष माळी, शुभम फुलपगारे, हर्षल साळुंखे, बाबा नाईक, निखिल खैरनार, विवेक तावडे, हर्षल कायंदे आदी युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा