Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील दहीवेलचा प्रणेता देसले यांचा अमेरिकेच्या नामांकित जरनल्सच्या एडिटोरिअल बोर्ड मध्ये समावेश.
साक्री तालुक्यातील दहीवेलचा प्रणेता देसले यांचा अमेरिकेच्या नामांकित जरनल्सच्या एडिटोरिअल बोर्ड मध्ये समावेश.
शनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक प्रणेता देसले यांचा अमेरिकेच्या जरनल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च व जरनल ऑफ प्रोटिओमिक्स या दोन नामांकित जरनल्सच्या एडिटोरिअल बोर्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. प्राध्यापक प्रणेता देसले हे गेल्या सोळा वर्षांपासून फार्मसी फिल्ड मध्ये योगदान देत आहेत. तसेच त्यांनी करोनाकाळातील पहिल्या लॉकडाऊनमध्ये देशातील विविध विद्यापीठ तसेच विविध संस्था विविध संघटना यांच्या मार्फत ऑनलाईन पध्दतीने आयोजित केलेल्या कॉन्फरंसेस, सेमिनार, वेबीनार, ई-समिट, लिडरशिफ टॉक, वर्कशॉप, पॅनल डिस्क्शन, करोनावर आधारीत प्रश्नमंजुशा इत्यादी पाचशे हुन अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविल्यामुळे वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे. प्राचार्य प्रणेता देसले यांनी महाराष्ट्र् राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या देखील आजपर्यंत यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. परिक्षा प्रमुख, विविध डिप्लोमा फार्मसी कॉलेजचे मुल्यांकन समिती अध्यक्ष पदाची जाबबदारी देखील पार पाडलेली आहे. तसेच महाराष्ट्र् राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे एम.एस.सी.आय.टी. या कॉम्प्युटर कोर्सच्या परिक्षसोठी त्यांची व्हिजीलन्स स्कॉड म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे. महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या डिप्लोमा फार्मसीच्या परिक्षांसाठी व्हिजीलंन्स स्कॉड म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच प्रणेता देसले यांचे विविध राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय जर्नल्स मध्ये आर्टीकल्स देखील प्रकाशीत झालेले आहेत. प्रणेता देसले यांना नवी दिल्लीच्या इंटरनॅशनल इंन्स्टीट्युट ऑफ एज्युकेशन ॲण्ड मॅनेजमेंट यांच्या तर्फे राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे तसेच प्रणेता देसले यांची विविध राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळात देखील कार्यरत आहेत. प्रणेता देसले यांनी करोना काळातील लॉकडाऊनचा अतिशय उत्तमरित्या उपयोग करुन देशातील विविध विद्यापिठांतर्फे तसेच शैक्षणीक संस्थांतर्फे व शासनातर्फे आयोजीत केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करुन पाचशे हुन अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवुन सहभाग प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यामुळे त्यांच्या नावाची वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आलेली आहे. प्रणेता देसले यांच्या सदर यशाबद्दल शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घर...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा