Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

नवागांव गावातील पाण्याची समस्या तातडीने सोडविणे बाबत जितेंद्र पावरा यांची मागणी…!



शिरपुर प्रतिनिधी :- तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर व कुपनलिकेची मोटर नादुरुस्त असल्याने गावातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जितेंद्र पावरा यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडे नवागांव गावातील पाण्याची समस्या तातडीने सोडविणे बाबत अर्जाद्वारे मागणी केली...
  

निवदेन म्हटले आहे की,बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव गावात पिण्याच्या पाण्याचे व वापर पाण्याची तीव्र समस्या मागील ६/७ दिवसापासून झालेली असुन ग्रामपंचायत अंतर्गत विहीर व कुपनलिकेची मोटर नादुरुस्त असल्याने गावातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे… 
 
सदर गावे हे आदिवासी बहुल असल्याने या गावांत पुर्णपणे आदिवासी समाजाचे वास्तव असल्याने नागरिकांना शेती – शेतमजुरी करत असतो.त्यामुळे स्त्री – पुरुष दिवसभर अंग मेहनतीचे काम करत असतात त्यामुळे दिवसभर कामाचा थकवा व परत घरी आल्यानंतर  पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असते व बहुतेक लोक गुरे-ढोरे आदि पाळीव प्राणी घरात ठेवत असतात. त्यामुळे जेवढे पाणी माणसांना लागते तेवढेच पाणी पाळीव जनावरांना सुध्दा लागत असते…नवागांव गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर व कुपनलिकेची मोटर लवकरात लवकर दुरुस्ती करुन तातडीने पाणी समस्या सोडवावी तसेच ३/४ दिवसात पाणी समस्या न सुटल्यास पुढिल स्तरावर तक्रार करण्यात येणार असे निवेदनात म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध