Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत "प्लॉगरन व स्वच्छता रॅली" उत्साहात संपन्न...!
शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत "प्लॉगरन व स्वच्छता रॅली" उत्साहात संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी : केंद्र शासन मार्फत देशभरात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान राबविले जात असून माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत दि.१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता शिरपूर शहरातील मुकेश पटेल रिक्रिएशन गार्डन पासून "प्लॉगरन व स्वच्छता रॅली" काढण्यात येऊन करवंद नाका, निमझरी नाका येथून आर.सी.पटेल इंजीनिअरिंग कॉलेजला रॅलीचा समारोप करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत "प्लॉगरन"(स्वच्छता रॅली) चे उद्घाटन करण्यात आले. शहरातून या मुख्य रस्त्यावरून शिरपूर-शहादा रस्त्यावर सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या विविध महाविद्यालयांचे, शाळांचे विद्यार्थी,एन.एस.एस.चे विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,माजी नगरसेविका,अनेक पदाधिकारी,असंख्य विद्यार्थी यांनी हातात बॅनर घेऊन स्वच्छतेबाबत विविध घोषणा दिल्या.उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन परिसराची साफसफाई केली.आर.सी.पटेल इंजीनिअरिंग कॉलेजला रॅलीचा समारोप झाला.
स्वच्छता रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,सौ.कृतिबेन भूपेशभाई पटेल,आर्यन अमीन मुंबई,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, नाटूसिंग गिरासे,राजेंद्र अग्रवाल,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा,माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकिय अधिकारी संजय हासवानी, माजी नगरसेवक,माजी नगरसेविका, पदाधिकारी,एन.एस.एस.स्वयंसेवक, महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी रॅलीला संबोधित केले. रॅली स्वच्छता रॅलीच्या आयोजनाबाबत आनंद व्यक्त करून सर्व उपस्थित मान्यवर यांचे आभार शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी मानले.
सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांना स्वच्छतेबाबत शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात भूपेशभाई फ्रेंड सर्कल, भूपेशभाई ग्रीन आर्मी, मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट,सागर मित्र पुणे, बालाजी सेवा समिती,आर.सी.पटेल इंजिनिअरिंग कॉलेज,आर.सी.पटेल आय.एम.आर.डी.कॉलेज,आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज,आर.सी.पटेल सिनिअर कॉलेज,एच.आर.पटेल महिला कॉलेज,एच.आर.पटेल फार्मसी कॉलेज,आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय,एच.आर.पटेल कनिष्ठ महाविद्यालय व विविध महाविद्यालयांचे एन.एस.एस. युनिट, शिरपूर वरवाडे नगरपरिषद आरोग्य विभाग यांचा सहभाग होता.
मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्वच्छ प्लास्टिक संकलना बाबत सविस्तर माहिती डॉ. सुप्रिया पंतवैद्य व पौर्णिमा पाठक यांनी दिली.स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियान बाबत आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंखे यांनी माहिती दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा