Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरातील २२ वर्षीय भोई समाजातील युवकाच्या खुनाबाबत पोलिसांचे नागरिकांना जाहीर आव्हान....माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार....
शिरपूर शहरातील २२ वर्षीय भोई समाजातील युवकाच्या खुनाबाबत पोलिसांचे नागरिकांना जाहीर आव्हान....माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार....
शिरपूर शिरपूर प्रतिनिधी: शहरातील २२ वर्षीय भोई समाजातील युवकाच्या खुनाबाबत पोलिसांचे नागरिकांना जाहीर आव्हान माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे
दिनांक ०४/०२/२०२३ रोजी सायंकाळी १८.३० वाजेचे सुमारास शिरपुर जि.धुळे शहरात क्रांती नगर येथे शिंगावे रस्त्यावर मयत राहुल राजु भोई वय २२ वर्ष रा.बालाजी नगर शिगावे ता.शिरपुर जि.धुळे यास १) गणेश ऊर्फ भट्या सुभाष जगताप (पाटील) रा. बालाजी नगर, शिंगावे ता. शिरपूर जि.धुळे,२) दादा पाटील पुर्ण नाव माहित नाही,३) बंटी पाटील पुर्ण नाव माहित नाही,४) विक्की दत्तु पाटील,५) मोहा ऊर्फ मोहित धाकड पुर्ण नाव माहित नाही,६) दिपक धोबी पुर्ण नाव माहित नाही,७) कोहिनुर राजपुत पुर्ण नाव माहित नाही व त्यांचे सोबत इतर मुले अशांनी मागील भांडणाची कुरापत काढुन त्याचेवर हल्ला करून त्याचेवर गणेश ऊर्फ भट्या सुभाष जगताप (पाटील) याने चाकुने वार करून त्यास जिवे ठार मारले बाबत मयताचे वडील श्री राजु गुलाब भोई यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शिरपुर शहर पो स्टे गुरनं ४० / २०२३ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचे तपासात शिरपुर शहर पो स्टे चे पोलीस निरीक्षक श्री ए एस आगरकर यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळे तपास पथक स्थापन करुन वेगाने तपासा चक्रे फिरवून सदर गुन्हयातील आरोपी नामे गणेश ऊर्फ भट्या सुभाष जगताप (पाटील),बंटी नितीन पाटील अशांना धुळे येथे ताब्यात घेतले असता गणेश ऊर्फ भट्या सुभाष जगताप हा जखमी अवस्थेत असल्याने त्याचेवर धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरु आहे.
तसेच सदर गुन्हयाचे तपासात विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच त्याचे सोबतचा इतर आरोपी मधील हरीओम संजय सिंग अशांना नाशिक येथुन तसेच कोहिनुर राजपुत यास शिरपुर मधुन, तसेच विक्की ऊर्फ विवेक दत्तु ऊर्फ दत्तात्रय पाटील व दिपक प्रकाश ईशी (धोबी) अशांना धुळे येथून ताब्यात घेवुन आरोपीतांना गुन्हयात अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक ०९/०२/२०२३ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकास धुळे येथील बाल न्याय मंडळा समोर हजर केले असता त्यास मुलांचे निरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे.
अशा प्रकारे घटना घडल्या पासुन अवघ्या ४८ तासांचे आंत निष्पन्न आरोपीतांपैकी ०६ आरोपी तसेच ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक अशांना ताब्यात घेण्यात यश आले असुन लवकरात लवकर उर्वरीत आरोपी तसेच इतर आरोपीतांचा शोध घेवून त्यांना गुन्हयात अटक करीत आहोत..
सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण वैज्ञानिक पध्दतीने काटेकोरपणे सखोल तपास सुरु असुन गुन्हयाचे तपासात आरोपीतां सोबतचे इतर आरोपीतांचा कसोशीने शोध घेवून त्यांना निष्पन्न करुन गुन्हयात अटक करीत आहोत. सदर गुन्हयाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक श्री ए एस आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश कुटे हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने शिरपुरचे जनतेस जाहिर आवाहन करण्यात येते की, आपणास जी काही माहिती असेल ती निःसंकोचपणे आम्हास द्यावी सदर बाबत आपले नांव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच नागरीकांनी कोणत्याही अफवांना बळी पडु नये.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री ए एस आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर,तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री किरण बान्हे,गणेश कुटे,संदिप मुरकुटे,शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी, कैलास वाघ, पोलीस नाईक मनोज पाटील,हेमंत पाटील,पोकों विनोद अखडमल,गोविंद कोळी,प्रविण गोसावी,मुकेश पावरा,प्रशांत पवार, सचिन वाघ,भटू साळुंखे, कैलास चौधरी,स्वप्निल बांगर,अमित रणमळे, उमाकांत वाघ,आरीफ तडवी,मनोज दाभाडे,चापोहेकॉ नासिर पठाण, चापोकों भाऊसाहेब मायचे,चापोको जितेंद्र मालये अशांनी मिळून केलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा